'Dunagiri' Warship : स्वदेशी ‘स्टेल्थ फ्रिगेट’ तंत्रज्ञानाने बांधणी केलेली ‘दुनागिरी’ युध्दनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द

युद्धनौका निर्मितीमध्ये आत्मनिर्भरतेला मोठी चालना


मुंबई : गार्डन रीच शिपबिल्डिंग अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई) येथे बांधण्यात आलेली नीलगिरी दर्जाची (प्रकल्प १७ ) पाचवी आणि या वर्गातील दुसरी युद्धनौका, ‘दुनागिरी’ (यार्ड ३०२३ ), ३० मार्च, २०२६ रोजी कोलकाता येथील जीआरएसईमध्ये भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. युद्धनौकांची रचना बांधणी करण्यामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रकल्प 17 ए फ्रिगेट्स या बहुपयोगी आणि बहु-उद्देशीय युद्धनौका असून, सागरी क्षेत्रातील सध्याच्या आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे.


दुनागिरी ही पूर्वीच्या आयएनएस दुनागिरी या लिअँडर-श्रेणीच्या फ्रिगेटचीच पुढची आवृत्ती आहे. आयएनएसप्रमाणेच दुनागिरीची निर्मिती केली आहे. याआधी ५ मे १९७७ ते १० ऑक्टोबर २०१० पर्यंत दुनागिरी भारतीय नौदलाच्या ताफ्याचा एक भाग होती, आणि तिने राष्ट्राला 33 वर्षांची गौरवशाली सेवा दिली. या अत्याधुनिक फ्रिगेटने नौदल रचना, गुप्तता, मारक क्षमता, स्वचालन आणि टिकाऊपणा यामध्ये एका पिढीची झेप घेतली आहे. त्यामुळे दुनागिरी युद्धनौका बांधणीतील आत्मनिर्भरतेचे एक प्रशंसनीय प्रतीक बनली आहे.


डब्ल्यूडीबी म्हणजेच ‘वॉरशिप डिझाइन ब्युरो’ द्वारे डिझाइन केलेली, आणि ‘वॉरशिप ओव्हरसीइंग टीम’ (कोलकाता) द्वारे देखरेख केलेली, पी17 ए फ्रिगेट्स स्वदेशी नौका रचना, गुप्तता, टिकाऊपणा आणि लढाऊ क्षमतेमध्ये एक झेप दर्शवते. एकात्मिक बांधकामाच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन, हे जहाज नियोजित वेळेत बांधले गेले आणि सुपूर्द करण्यात आले.


पी 17 (शिवालिक) श्रेणीच्या तुलनेत पी17 ए जहाजे प्रगत शस्त्र आणि सेन्सर प्रणालीने सुसज्ज आहेत. या जहाजांमध्ये संयुक्त डिझेल किंवा गॅस (सीओडीओजी) ‘ प्रोपलशन’ प्रणाली बसवलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक शाफ्टवरील नियंत्रक ‘पिच प्रोपेलर’ चालवणारे एक डिझेल इंजिन आणि एक गॅस टर्बाइन, तसेच अत्याधुनिक एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली (आयपीएमएस) यांचा समावेश आहे. शक्तिशाली शस्त्र आणि सेन्सर्सच्या संचामध्ये ब्रह्मोस एसएसएम , एमएफस्टार आणि एमआरसॅम कॉम्प्लेक्स, ७६ मिमी एसआरजीएम, आणि ३० मिमी आणि १२.७ मिमी क्लोज-इन वेपन सिस्टीम यांचे मिश्रण आहे. तसेच पाणबुडीविरोधी युद्धासाठी रॉकेट आणि टॉर्पेडो यांचा समावेश आहे.


'दुनागिरी' हे गेल्या १६ महिन्यांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणारे पी 17 ए श्रेणीतील पाचवे जहाज आहे. पहिल्या चार पी 17 ए जहाजांच्या बांधकामातून मिळालेल्या अनुभवांमुळे, 'दुनागिरी'च्या बांधकामाचा कालावधी ९३ महिन्यांवरून (या श्रेणीतील पहिले जहाज - 'निलगिरी' - बांधण्यासाठी लागलेला कालावधी) कमी करून ८० महिन्यांपर्यंत आणणे शक्य झाले आहे.


'दुनागिरी'चे नौदलाकडे हस्तांतरण हे देशाची जहाज रचना, जहाज बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नैपुण्य अधोरेखित करते; तसेच जहाज रचना आणि जहाज बांधणी या दोन्ही क्षेत्रांत नौदलाने सातत्याने 'आत्मनिर्भरते'वर दिलेला भर दिसून येतो.


या जहाज बांधणीमध्ये ७५ % स्वदेशी घटकांचा समावेश आहे. या प्रकल्पात २०० पेक्षा जास्त 'एमएसएमई' (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) सहभागी झाले आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे ४.००० व्यक्तींना प्रत्यक्ष आणि १००००पेक्षा जास्त व्यक्तींना अप्रत्यक्षपणे रोजगार निर्मितीचा लाभ मिळाला आहे.

Comments
Add Comment

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह राज्यातील

अश्विनी भिडेंनी BMC आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

मुंबई : ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते

राज्यात १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत राज्य सरकारने आज, मंगळवारी एकाचवेळी १० वरिष्ठ सनदी

मुंबईत वीज दरात कपात; एप्रिल २०२६ पासून ग्राहकांना मोठा दिलासा

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पावर आणि अदानी

नवीन आयकर कायदा आणि अनेक अर्थसंकल्पीय तरतुदी १ एप्रिलपासून होणार लागू

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीबरोबरच, देशाच्या आयकर रचनेतही १ एप्रिलपासून मोठे बदल होणार

Navnath Ban : मतदारांनी नाकारल्यामुळे संजय राऊत, उबाठा गट नामर्द बनल भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : १४० कोटी भारतीय नेभळट आणि भ्याड नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे समर्थ नेतृत्व जनतेच्या