शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिवशाही पुनर्वसन' प्रकल्पाला बळकटी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा पुढे नेत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. पारदर्शकता आणि वेग ह्याला आमची प्राथमिकता असून प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आता खाजगी विकासक आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांच्यात 'विशेष संयुक्त उपक्रम' (एसपीव्ही) तयार करण्यास मान्यता देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.


नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवशाही पुनवर्सन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, शिवशाही प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार, महाव्यवस्थापक अशोक नाईकवडे आदी उपस्थित होते.


यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईसह राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला वेग देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 'शिवशाही पुनर्वसन प्रकल्पा'ला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे.


प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आता खाजगी विकासक आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांच्यात 'विशेष संयुक्त उपक्रम' तयार करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. यामुळे पुनर्वसनाचे प्रकल्प खाजगी क्षेत्रातील कौशल्याच्या मदतीने जलदगतीने पूर्ण होऊ शकतील. त्याचबरोबर रखडलेले पुनर्वसन प्रश्न मार्गी लावून सर्वसामान्यांना हक्काची घरे देतानाच शिवशाही प्रकल्प कंपनीने एमएमआरडीए, एसआरए, म्हाडा, सिडको, मुंबई महापालिका, ठाणे पालिका यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पांना वेग द्यावा, असे निर्देश दिले. तांत्रिक अडचणींमुळे रखडलेले प्रकल्प शिवशाही प्रकल्पात घेतले तर ते वेगाने पूर्ण होवू शकतात. शिवशाही शासकीय कंपनी असल्याने तांत्रिक अडथळ्यांवर मार्ग काढतानाच चटई निर्देशांकाचा फायदा देखील मिळू शकतो त्याने प्रकल्पाला अधिक गती मिळू शकेल.


केवळ घरेच नव्हे, तर झोपडपट्टी भागातील लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत एमएसएमई पार्क उभारण्यात यावे. तसेच, शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर महिलांसाठी 'लघु उद्योग प्रकल्प' सुरू करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला.


शिवडी येथील राहुलनगर मधील इमारत क्र. २ दुरुस्तीच्या विषयावर यावेळी चर्चा झाली. ७२ सदनिकांच्या स्ट्रक्चरल मजबुतीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ४ कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली. ९ खाजगी विकासकांकडे संक्रमण सदनिकांचे १४३.४४ कोटी भाडे थकीत असून वसुली सुलभ व्हावी म्हणून वार्षिक भाडेवाढ १० टक्के ऐवजी ५ टक्के करणे आणि विलंब शुल्क १६ टक्के ऐवजी ८ टक्के करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.


शिवशाही प्रकल्पाला अधिक बळकटी देण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता व्हावी यासाठी एसआरएच्या धर्तीवर मनुष्यबळ निर्मितीचा सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.


Comments
Add Comment

ST BUS : आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास मुंबई : ‘पंढरीची वारी’ (Pandharpur Wari) ही

BMC NEWS : दादरमध्ये मॅनहोलची जाळी चोरीचा प्रयत्न फसला, झाकण टाकले उघडे

महापालिका कर्मचारी नगरसेवकाच्या प्रसंगावधनाने त्वरीत बसवले

BMC : महापालिका मुख्यालय मुख्य आणि विस्तारीत इमारतींच्या दुरुस्तीवर पुन्हा साडेआठ कोटींचा खर्च

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील विस्तारीत सहा मजल्याच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम तब्बल १४ वर्षे सुरु

BMC : मुंबई महापालिका सभागृहातील आवाज होणार बुलंद, करावी लागणार नाही उचलाउचली!

मुंबई : मुंबई महापालिका सभागृहातील पूर्वापार चालत आलेले लटकते माईक हद्पार करून नगरसेवकांचा आवाज बुलंद

BMC News : प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर जाऊ शकेल अशी लिफ्ट बंधनकारक

महापालिकेच्या डीसी रुल्समध्ये सुधारणा करण्याची भाजप नगरसेविकेची मागणी मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक

Rajawadi Hospital : राजावाडी रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर

४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६