Fertilizer Shortage : आखाती देशांतील युद्धामुळे महाराष्ट्रात खतांचा तुटवडा

मुंबई : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या बांधापर्यंत पोहोचले आहेत. या युद्धामुळे आखाती देशांशी होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाल्याने याचा सर्वाधिक फटका खतनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्याला बसला आहे. परिणामी, भविष्यात राज्यात युरियाचा मोठा तुटवडा भासण्याची शक्यता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. या संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.


आखाती देशांतील युद्धामुळे शेतीमालाच्या आयात-निर्यातीवर १०० टक्के परिणाम झाला. भारताचा मोठा शेतीमाल या देशांमध्ये निर्यात होतो; मात्र सध्या हा मार्ग ठप्प झाल्याने राज्यातील बाजारपेठांमध्ये मालाची आवक वाढली आणि भाव कोसळले आहेत. याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसत आहे. "निर्यात थांबल्याने स्थानिक बाजारात भाव पडले आहेत. खत निर्मितीच्या कच्च्या मालावर परिणाम झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते," असे भरणे यांनी स्पष्ट केले.


राज्यातील हवामान बदलाबाबत सतर्क करताना कृषी मंत्र्यांनी सांगितले की, १७ एप्रिलनंतर तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने जलसंकटाची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.


पंचनाम्यानंतर तातडीने मदत


राज्यात अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. प्रशासनाकडून अंतिम अहवाल प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, असे आश्वासनही कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

BMC : बीकेसीतील स्वच्छतेची महापालिकेला काळजी, यांत्रिक झाडूद्वारे केली जाते साफसफाई

- वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपयांचा केला जातो खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) वांद्रे कुर्ला संकुलातील संकुलात

Malad West Flyover : मालाड पश्चिम उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरणाच्या कंत्राटात महापालिकेचा अनोखा प्रयोग

- एल अँड टी पात्र, पण नुकसान भरपाईची ३५० कोटी रक्कम वाचवण्यासाठी जे कुमार आरपीएस कंपनीला दिले काम मुंबई (सचिन

Maharashtra School : यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून सुरू होणार शाळा

मुंबई : दरवर्षी कडक उन्हाळ्यामुळे विदर्भात ३० जूनपासून तर राज्यात उर्वरित ठिकाणी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याची

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism