बिकट परिस्थिती, घरची जबाबदारी, अन पोलीस भरतीच स्वप्न; नेमकं भरतीवेळी शरीर थकलं अन्...

पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न बघत असतात. असंच एक स्वप्न राज्यातल्या बुलढाणा जिल्ह्यातील तरुणानं बघितलं. पुरुषोत्तम भीमराव बुरकूल असं याचं नाव. (वय २३ वर्ष) हा तरुण पोलीस भरतीसाठी पुण्यात आला. कसून तयारी केली. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.



नेमकं काय घडलं?


बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यातील चिंचोली बुरकूल या गावातला पुरुषोत्तम भीमराव बुरकूल ( वय २३ ) पोलीस भरतीसाठी पुण्यात आला. पुण्यात पोलीस भरती प्रक्रिया नियमानुसार सुरू होती. पुरुषोत्तम या भरती प्रक्रियेत सहभागी झाला.


पोलीस भरतीसाठी २८ मार्चला शारीरिक चाचणी घेण्यात आली. अनेक तरुण तरुणी आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत होते. आणि शेवटी भरती प्रक्रियेचा अत्यंत महत्वाचा टप्पा सुरू झाला. तो म्हणजे १६०० मीटर धावण्याचा, या प्रक्रियेत पुरुषोत्तम ही सहभागी झाला.


पुरुषोत्तमने सुरुवातीच्या दोन फेऱ्या अत्यंत जिद्दीने पूर्ण केल्या, मात्र तिसरी फेरी धावताना त्याच्या शरीराने साथ दिली नाही. त्याचा श्वास फुलला आणि धावत असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तो धाडकन जमिनीवर कोसळला. उपस्थित पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय पथकाने त्याला तात्काळ प्रथोमपचार देऊन ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.



कुटुंबाचा आधार हरपला


पुरुषोत्तम हा अत्यंत गरीब घरातून सरकारी नोकरीच्या आशेने पुण्याला आला होता. त्याचे वडील अनेक वर्षांपासून पॅरालिसीस या आजाराने अंथरुणाला खिळलेले होते. घरात आई आणि दोन बहिणी होत्या. वडिलांच्या आजारपणानंतर पुरुषोत्तम हा घरातला कर्ता पुरुष होता. त्याच्या अशा जाण्याने घरावर, बुरकूल गावावर शोककळा पसरली आहे. सरकारी नोकरी मिळवून वडिलांचे उपचार आणि घराला आधार द्यायचे त्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. पोलीस भरतीसाठी मेहनत तर घेतली पण शरीरानेच साथ सोडली.

Comments
Add Comment

ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसाने झोपडले; आयटी पार्कमध्ये साचला बर्फ

पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये

येत्या तीन महिन्यांत 'पीएनजी' साठी अर्ज न केल्यास 'एलपीजी' सिलिंडर बंद

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ मुंबई : राज्यातील

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा पणन मंत्री जयकुमार रावल

वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्था मुंबई : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून

Pandharpur News : पंढरपुरात पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांच्या कारसह ४ किलो गांजा जप्त

पंढरपूर : पंढरपूर शहरात पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती

Pandharpur News : पंढरपुरात विठ्ठलाच्या पुरणपोळीच्या नैवेद्याला विरोध, ३०० वर्षाची परंपरा काय सांगते ?

पंढरपूर : विठ्ठल चरणी अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यावरून आता पंढरपुरात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. चैत्र