Vijaypat Singhania : एका सहीमुळे बदललं विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य, १२०० कोटींची संपत्ती असतानाही रहावं लागलं भाड्याच्या घरात

मुंबई : पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित, रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष आणि उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ. विजयपत सिंघानिया (vijay singhania) यांचं शनिवारी सायंकाळी मुंबईत दुख:द निधन झालं. त्यांच्या निधनानं उद्योग आणि समाजकारण, विमानचालन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीयं.

'द कम्प्लीट मॅन' आणि 'फील्स लाइक हेवन' यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून शून्यातून सुरुवात करून अब्जावधींची संपत्ती कमावणारे आणि आपली कंपनी जगभरात पोहोचवणारे रेमंडचे मालक विजयपत सिंघानिया यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं उद्योग आणि समाजकारण, विमानउद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीयं.

भारताचे 'टेक्सटाईल टायकून' म्हणून ओळखले जाणारे विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. ही घोषणा त्यांचे पुत्र आणि रेमंडचे सध्याचे मालक, गौतम सिंघानिया यांनी केली. आपल्या ८७ वर्षांच्या आयुष्यात विजयपत सिंघानिया यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. त्यांनी यशाची सर्वोच्च पायरी चढली आणि प्रेमातील विश्वासघातही सहन केला. जेके हाऊसचे मालक आणि अब्जाधीश असलेल्या या व्यक्तीला एकेकाळी भाड्याच्या घरात राहण्यास भाग पडले होते.

१९२५ मध्ये ठाण्यातील वाडिया मिल या लोकरीच्या गिरणीत सैन्यासाठी गणवेश शिवण्यापासून रेमंडची सुरुवात झाली. १९८० मध्ये रेमंडचा ताबा घेतल्यानंतर, विजयपत सिंघानिया यांनी रेमंडला मोठ्या उंचीवर नेलं. रेमंड केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही पोहोचला होता. त्यांनी भारताच्या वस्त्रोद्योगाला ओळख मिळवून दिली, पण एक वेळ अशी आली की, ज्या विजयपत यांनी आपल्या कपड्यांनी जगाला परिपूर्ण बनवलं होतं, त्यांनाच त्यांच्या लोकांनी बेघर केलं. एका सहीमुळे ते केवळ त्यांच्या कंपनीतूनच नव्हे, तर त्यांच्या ३४ मजली आलिशान घरातूनही बेघर झाले.

रेमंडला यशाच्या शिखरावर नेल्यानंतर, त्यांनी २०१५ मध्ये कंपनी आपला मुलगा गौतम सिंघानिया याच्याकडे सोपवली. त्यांनी आपले सर्व शेअर्स, ज्यांचे मूल्य तेव्हा १००० कोटी रुपये होते, आपल्या मुलाला दिले आणि १२,००० कोटी रुपये किमतीची रेमंड कंपनी त्याच्या हवाली केली. कंपनी आणि शेअर्सवर ठेवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा त्यांना तितकाच मोठा विश्वासघात अनुभवायला मिळाला. याच एका कृत्यामुळे केवळ आपली संपूर्ण बचतच नव्हे, तर घर, गाडी आणि ड्रायव्हरसुद्धा गमवावा लागेल, याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती.

विजयपत सिंघानिया यांनी स्वतःच आपल्या मुलावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी मुंबईत ३४ मजली जेके हाऊस बांधले, पण कंपनी मुलगा गौतमच्या हवाली करताच त्यांनी त्याच्या आई-वडिलांना त्याच घरातून जबरदस्तीने बाहेर काढले. त्यांनी केवळ घरच नाही, तर गाडी आणि ड्रायव्हर यांसारख्या मूलभूत सुविधाही काढून घेतल्या. इतकेच नाही, तर आपल्या नावापुढे 'चेअरमन एमेरिटस' ही उपाधी लावण्याचा हक्कही त्यांनी काढून घेतला.

रेमंडप्रमाणे अब्जावधींची संपत्ती कमावून एक बहुराष्ट्रीय कंपनी उभी करणाऱ्या आपल्याच मुलाने विश्वासघात केल्यामुळे, त्यांना आपल्या पत्नीसोबत दोन भाड्याच्या घरांमध्ये राहण्यास भाग पाडले. त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचा मुलगा गौतम त्यांना रस्त्यावर पाहून आनंदी झाला होता. "सर्व काही त्याच्या हाती सोपवणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती."

५,००० तासांचा उड्डाणाचा अनुभव असलेल्या विजपत सिंघानिया यांना उड्डाणाची प्रचंड आवड होती. वयाच्या ६७ व्या वर्षीही त्यांनी जगातील सर्वात उंच हॉट एअर बलून उड्डाणाचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी रेमंडला यशाच्या शिखरावर नेले. त्यांनी १२,००० कोटी रुपयांची मालमत्ता, अब्जावधी डॉलर्सची रेमंड कंपनी आणि मुंबईतील मलबार हिल परिसरातील ३७ मजली जेके हाऊस आपल्या मुलाच्या नावावर केले. त्यानंतर ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचं त्यांनी म्हटलं.
Comments
Add Comment

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा