मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) ने एप्रिल महिन्यात खास आणि परवडणारी टूर पॅकेजेस जाहीर केली आहेत. १ ते १० एप्रिल दरम्यान विविध ठिकाणांसाठी ही पॅकेजेस उपलब्ध असणार असून, प्रवाशांना कमी खर्चात देशातील सुंदर ठिकाणे पाहण्याची संधी मिळणार आहे.
काश्मीर टूर: ‘स्वर्ग’ अनुभवण्याची संधी
‘HEAVENLY KASHMIR EX JAIPUR’ या पॅकेजअंतर्गत श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम या निसर्गरम्य ठिकाणांचा समावेश आहे.
प्रस्थान: जयपूर (१० एप्रिल)
कालावधी: ५ रात्री / ६ दिवस
प्रवास: फ्लाइट + कॅब
किंमत:
एकट्यासाठी: ₹५१,०४०
२ जणांसाठी: ₹४०,८९० प्रति व्यक्ती
३ जणांसाठी: ₹३९,४६० प्रति व्यक्ती
मुलांसाठी: ₹३३,९६०
कर्नाटक टूर: कुर्ग–म्हैसूरचा निसर्गसफर
‘कॉफी विथ कर्नाटक’ पॅकेजमध्ये कुर्ग आणि म्हैसूर या हिरव्यागार ठिकाणांचा समावेश आहे.
प्रस्थान: हैदराबाद (१ एप्रिल)
कालावधी: ५ रात्री / ६ दिवस
प्रवास: फ्लाइट + कॅब
किंमत:
एकट्यासाठी: ₹१६,७००
२ जणांसाठी: ₹१४,०१० प्रति व्यक्ती
३ जणांसाठी: ₹१०,९३० प्रति व्यक्ती
मुलांसाठी: ₹९,८१०
गोवा टूर: बीच आणि मजेचा परफेक्ट कॉम्बो
चंदीगड ते गोवा या रेल्वे टूरमध्ये समुद्रकिनाऱ्याचा आणि पार्टीचा आनंद घेता येणार आहे.
प्रस्थान: चंदीगड (४ एप्रिल)
कालावधी: ५ रात्री / ६ दिवस
प्रवास: ट्रेन + कॅब
किंमत:
एकट्यासाठी: ₹२७,०८५
२ जणांसाठी: ₹१९,४०५ प्रति व्यक्ती
३ जणांसाठी: ₹१८,५९५ प्रति व्यक्ती
मुलांसाठी: ₹१४,७२५
बुकिंग कसं कराल?
या सर्व पॅकेजेसचं बुकिंग तुम्ही Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सहज करू शकता. या टूर पॅकेजेसमुळे प्रवाशांना नियोजनाची चिंता न करता, किफायतशीर दरात देशातील लोकप्रिय पर्यटनस्थळांचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे ही खास संधी उन्हाळी सुट्ट्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.