आनंदाची बातमी, ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर भारताकडे रवाना

नवी दिल्ली : मागील एक महिन्यापासून पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक देश तेल आणि गॅसच्या टंचाईचा सामना करत आहे. पण भारतात पुरेसे पेट्रोल, डिझेल उपलब्ध आहे. देशातील एलपीजीचा साठाही समाधानकारक आहे. एकीकडे ही सुसह्य अशी स्थिती असतानाच देशात लवकरच ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर पोहोचणार आहेत. ‘BW Tyr’ आणि ‘BW Elm’ हे टँकर अनुक्रमे ३१ मार्च रोजी मुंबईत आणि १ एप्रिल रोजी न्यू मँगलोर (नवे मंगळुरू) येथे पोहोचण्याची शक्यता आहे.


युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तेल व्यापारावर परिणाम झाला असताना भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. ऐन युद्ध काळात अरुंद अशा होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतासाठी ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर निघाले आहेत. या टँकरनी सामुद्रधुनी पार केली असून लवकरच ते भारतात पोहोचणार आहेत. पश्चिम आखाती क्षेत्रात अजूनही ४८५ भारतीय खलाशांसह भारताचा ध्वज असलेली एकूण १८ जहाजं अद्याप समुद्रात आहेत.


भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा एलपीजी (LPG) आयातदार देश आहे. भारतात गेल्या वर्षी ३३.१५ दशलक्ष टन गॅसचा वापर केला गेला. भारताच्या एकूण गरजेपैकी सुमारे ६० टक्के गॅस हा आयात केला जातो. यामुळे ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर देशात पोहोचल्याने भारतातील एलपीजीच्या साठ्यात आणखी वाढ होणार आहे.

Comments
Add Comment

कुर्दिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला; अमेरिका-इराण तणाव पुन्हा तीव्र

वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील संपूर्ण प्रदेशात सध्या परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अशातच इराकच्या

Lock Down in Pakistan : पाकिस्तानची दयनीय अवस्था, युद्धामुळे लागले 'लॉकडाउन'; शहबाज सरकारचा निर्णय

इस्लामाबाद : इराण अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक देशांची तेलवाहू, गॅस वाहू जहाजे

Maan ki Baat, Narendra Modi : "मन की बात"मधून पंतप्रधानांचे ऊर्जा संकटावरील अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : जागतिक संघर्ष आणि ऊर्जा संकटावर चिंता व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात'

भरधाव वेगाने येत थारने तीन जणांना उडवले; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही

आयआरजीसीचा मोठा दावा; इराणने अमेरिकेचे एफ-१६ लढाऊ विमान पाडले

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांची एफ-१६ लढाऊ

Rain Alert: 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता, मुंबईसह गुजरातमध्ये उष्णतेची लाट

नवी दिल्ली: देशभरात हवामानात बदल दिसून येत आहे. देशाची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात आज पावसाची शक्यता आहे.