Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत करतात.


उन्हाळ्याची सुरुवात होताच बऱ्याच घरांमध्ये जेवताना नियमितपणे दही किंवा ताकाचं सेवनं करतात. या दोन्ही पदार्थांमध्ये प्रोबायोटीक्स अर्थात पोटासाठी फायदेशीर ठरणारे बॅक्टेरिया असतात. मात्र, फार कमी लोकांना हे माहित आहे की यापैकी आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी नेमकं काय फायदेशीर आहे? चला तर जाणून घेऊयात दही आणि ताक या दोन्हींपैकी नक्की काय फायदेशीर ठरेल याबद्दल.


दह्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल किंवा हाडे मजबूत करायची असतील, तर दही उत्तम आहे. आयुर्वेदानुसार, दही हे निसर्गात उष्ण प्रवृत्तीचं मानलं जातं. दही खाल्यानंतर पोटातील उष्णतेमुळे त्याचे आंबवण्याचे कार्य वाढते, ज्यामुळे काही लोकांना ॲसिडिटी किंवा पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवतात. दहीमध्ये ऊर्जेचं स्तोत्र मोठ्या प्रमाणात असतं. पण हे पचनासाठी जड मानलं जातं.


जर तुम्हाला दही खायचे असेल, तर ते दुपारच्या जेवणात खावं. रात्री दही खाणं टाळावं, कारण यामुळे कफ वाढण्याची शक्यता असते.


ताक हे दह्यापासून बनवलं जातं. पण त्यामध्ये पाणी मिसळ्यामुळे आणि घुसळ्यामुळे त्याचे गुणधर्म पूर्णपणे बदलतात. आयुर्वेदात ताकाला 'तक्र' म्हटलं जातं, ज्याची तुलना अमृताशी केली गेली आहे. दह्याच्या विरुद्ध, ताक हे निसर्गात अत्यंत शीत अर्थात थंड असतं. हे शरीराचं तापमान त्वरित कमी करण्यास मदत करतं आणि ताक पचायलाही हलकं असतं. जर तुम्हाला अपचन, गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल, तर ताक हे सर्वोत्तम पेय आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स घामाद्वारे बाहेर पडतात. ताक प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते आणि थकवा दूर होण्यास मदत मिळते.


उन्हाळ्यात दह्यापेक्षा ताक पिणं जास्त फायदेशीर ठरतं. दही हे पचायला जड असल्यानं उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असताना ताक घेणं अधिक फायदेशीर ठरतं.

Comments
Add Comment

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे