मुंबई : आयपीएल २०२६ च्या थराराला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात आरसीबी (Royal Challengers Bengaluru) आणि हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने येणार आहेत. हा सामना बंगळूरमधील चिन्नास्वामी मैदानावर रंगणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आरसीबीला मोठा धक्का बसला आहे.
हेझलवूडच्या अनुपस्थितीमुळे आरसीबीची गोलंदाजी कमकुवत होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात त्याने १२ डावांत २२ विकेट्स घेत संघाच्या यशात मोठा वाटा उचलला होता. त्याची ४/३३ ही सर्वोत्तम कामगिरी ठरली होती, तर इकॉनॉमी रेट ८.७७ होता.
दरम्यान, मुख्य प्रशिक्षक यांनी विराटच्या फॉर्मचेही कौतुक केले. ते म्हणाले, “जसे मी पूर्वी सचिन तेंडुलकरचा सराव पाहायचो, तसेच आता विराटचा सराव पाहणे आनंददायी आहे. तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून खूप फिट आणि निर्धाराने खेळताना दिसतो.”
जाणून घ्या आरसीबीचे यंदाच्या हंगामातील वेळापत्रक :
- २८ मार्च : RCB vs SRH – बंगळूर
- ५ एप्रिल : RCB vs CSK – बंगळूर
- १० एप्रिल : RCB vs RR – गुवाहाटी
- १२ एप्रिल : RCB vs MI – मुंबई
- १५ एप्रिल : RCB vs LSG – बंगळूर
- १८ एप्रिल : RCB vs DC – बंगळूर
- २४ एप्रिल : RCB vs GT – बंगळूर
- २७ एप्रिल : RCB vs DC – दिल्ली
- ३० एप्रिल : RCB vs GT – अहमदाबाद
- ७ मे : RCB vs LSG – लखनौ
- १० मे : RCB vs MI – रायपूर
- १३ मे : RCB vs KKR – रायपूर
- १७ मे : RCB vs PBKS – धर्मशाला
- २२ मे : RCB vs SRH – हैदराबाद
पहिल्याच सामन्यापूर्वी आलेल्या या धक्क्यामुळे आरसीबीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता संघ या परिस्थितीत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.