IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवरून आयपीएल २०२६ श्रीगणेशा! जाणून घ्या RCB vs SRH ची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

- पहिलाच सामना हायस्कोरिंग होणार ?


मुंबई : आजपासून म्हणजेच शनिवार २८ मार्च रोजी आयपीएलच्या १९व्या हंगामाची धमाकेदार सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिला सामना विराटच्या RCB आणि नवोदित कर्णधार ईशान किशनच्या SRH मध्ये रंगणार आहे. हा सामना बंगळुरूतील चिन्नास्वामी मैदानावर (Chinnaswamy Stadium) संध्याकाळी ७:३० पासून सुरु होईल. या दोन्ही संघांनी आपला पहिल्या सामन्यासाठी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार सराव केला आहे.


गतविजेता आरसीबी या सामन्यात विजयी सलामी देण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. तर दुसरीकडे, ईशान किशन (Ishan Kishan) कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात संघाला विजय मिळवून देतो का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.



फलंदाजीचा फटाकेबाज जल्लोष :


एम. चिन्नास्वामी स्टेडियम हे फलंदाजांसाठी अनुकूल मैदान मानले जाते. त्यामुळे घरच्या मैदानावर विराट (Virat Kohli) कडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर रजत पाटीदार, टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांसारखे आक्रमक फलंदाज आरसीबीला बळ देणार आहेत.


तर हैद्राबादकडून अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांसारखे विस्फोटक फलंदाज मैदान गाजवू शकतात. त्यामुळे चाहत्यांना हायस्कोरिंग सामन्याची मेजवानी मिळण्याची दाट शक्यता आहे.



गोलंदाजीही तोडीसतोड :


आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा आणि रोमारियो शेफर्ड यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल. तर एसआरएचकडून जयदेव उनडकट, हर्षल पटेल, शिवम मावी आणि ब्रायडन कार्स यांच्याकडून जोरदार आव्हान अपेक्षित आहे.


दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग XI :



रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु :


फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, कृणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जेकब डफी



सनरायजर्स हैदराबाद :


हेनरिक क्लासेन, ईशान किशन (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, लियाम लिव्हिंगस्टोन, हर्षल पटेल, जयदेव उनडकट, ब्रायडन कार्स, शिवम मावी


या दमदार लढतीत कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा