चोरीच्या संशयाने दोन चिमुकल्यांना रात्रभर उलटं टांगलं; सांगलीत खळबळ

सांगली: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून दोन निष्पाप चिमुकल्यांना उलटं टांगून रात्रभर अमानुष छळ करण्यात आला. या क्रूर अत्याचारात १० वर्षीय सानिका हिचा मृत्यू झाला, तर तिची ११ वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.


घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्याने घेतल्याने संतापाच्या भरात या दोन चिमुकल्यांवर त्यांच्या आई-वडिलांकडून निर्दयी अत्याचार करण्यात आला. नाना हैबत यमगर असं मुलींच्या वडिलांचं नाव आहे.


बुधवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास मुलींच्या वडिलांनीच दोन्ही मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटं टांगलं. रात्रभर त्या चिमुकल्या वेदनेने तडफडत 'पाणी, पाणी' अशी आर्त हाक देत होत्या. मात्र, निर्दयी आई-वडिलांनी त्यांना मदत तर दूरच, पाण्याचा थेंबही दिला नाही.



रात्रभर झालेल्या छळाने पहाटे मृत्यू


असह्य वेदना सहन करताना सानिकाने रात्रीच प्राण सोडले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी मृत आणि उलटी टांगलेल्या अवस्थेत असतानाही आई-वडील त्या खाली निवांत झोपले होते. गुरुवारी सकाळी आजोबांनी मुलींना खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सानिका मृतावस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती.


अनुजाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर सानिकाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.



बहिणीच्या जबाबातून उघड झाला प्रकार


अनुजा शुद्धीवर आल्यानंतर तिने डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार उघड झाला. 'वडिलांनी आम्हाला उलटं टांगून मारहाण केली' असं तिने सांगितल्यावर डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि या अमानुष घटनेचा पर्दाफाश झाला.


सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपींवर खून आणि खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे समाजमन हादरलं असून बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Rain Update: राज्यातील 'या' भागात दोन दिवस वादळी पावसाचा अलर्ट

मुंबई: सध्या राज्यातील काही भागात अंशतः हवामान आभाळी असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे.

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र