मराठी रंगभूमीवर आता चालणार 'दाभोळकरी पॅटर्न'; 'कॅरी ऑन स्पायगिरी' मधून भरत दाभोळकर यांचा धमाका!

मुंबई: अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे प्रणेते आणि प्रसिद्ध 'अॅड गुरु' भरत दाभोळकर प्रथमच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एक आगळेवेगळे नाटक घेऊन येत आहेत. 'सवाईगंधर्व' निर्मित 'कॅरी ऑन स्पायगिरी' हे नाटक लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


इंग्रजीतील गाजलेलं नाटक आता मराठमोळ्या ढंगात : आतापर्यंत भरत दाभोळकर यांनी पु.ल. देशपांडे, वसंत कानेटकर, जयवंत दळवी यांसारख्या दिग्गज मराठी लेखकांची नाटकं इंग्रजीत नेली आणि ती गाजवली. अनेकदा हलके-फुलके विषय घेऊन स्वतः दाभोळकरांनीही आपल्या लेखन-दिग्दर्शनाने हिन्दी, इंग्रजी, गुजराती प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळीही ते स्वतःचं मूळ इंग्रजी नाटक मराठीत घेऊन येत आहेत. यापूर्वी इंग्रजीत हे नाटक विजू खोटे, किशोर प्रधान, विहंग नायक, वृषाली गोखले, अतुल परचुरे, अतुल काळे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हे नाटक अजरामर केले होते. आता हेच नाटक मराठीत आणण्याचे धाडस निर्माते आकाश भडसावळे यांनी केले आहे.


आता 'मराठमोळं' कुटुंब पाकिस्तानात! : मूळ इंग्रजी नाटकात एक गुजराती कुटुंब दाखवण्यात आले होते, मात्र मराठी प्रेक्षकांची नस ओळखून लेखनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नाटकाचा मूळ गाभा तोच ठेवून संपूर्ण नाटक आता 'मराठमोळ्या' पद्धतीने सादर होणार आहे. भरत दाभोळकर म्हणतात, "मराठीत आतापर्यंत विनोद, सस्पेन्स आणि ऐतिहासिक नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. इंटरनेटमुळे आजच्या पिढीला जगभरातील गोष्टी ठाऊक आहेत. अशातच एखादं मराठमोळं कुटुंब जेव्हा पाकिस्तानात जातं, तेव्हा तिथे उडणारी त्यांची धांदल आणि तो 'अॅडव्हेंचरस' प्रवास पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल."


भन्नाट टीम आणि भन्नाट अनुभव : या नाटकाच्या निमित्ताने भरत दाभोळकर आणि अभिनेते-निर्माते आकाश भडसावळे ही जोडी एकत्र आली आहे. आकाशबद्दल बोलताना दाभोळकर सांगतात की, "आकाश हा एक अत्यंत ऑर्गनाइज आणि प्रो-अॅक्टिव्ह प्रोड्युसर आहे, त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान आहे." या नाटकात भरत दाभोळकर यांच्यासोबत त्यांचे इंग्लिश-हिन्दी नाटकातील अनेक वर्षांचे जुने सहकारी आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आझाद ही जोडी पुन्हा एकदा रंगमंचावर कमाल करताना दिसेल.


ओटीटीला कंटाळलेला प्रेक्षक आता नाटकाकडे! : सध्या मराठी नाटकांना मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. भरत दाभोळकर यांच्या मते, "जेव्हा मराठी माणूस ओटीटीवरील साचेबद्ध कंटेट पाहून कंटाळतो, तेव्हा तो ताज्या दमाच्या अनुभवासाठी नाटकाकडे वळतो. म्हणूनच 'कॅरी ऑन स्पायगिरी' सारखा हलका-फुलका आणि साहसी विषय प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरेल."


शुभारंभाचे प्रयोग: १० एप्रिल २०२६ रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई. तर १८ एप्रिल २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. अस्सल 'दाभोळकरी' शैलीतील हे स्पाय-कॉमेडी नाटक मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहे.

Comments
Add Comment

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित