'Jag Vasant' Ship : आनंदवार्ता! होर्मुज सामुद्रधुनीत अडकलेले भारतीय जहाज ‘जग वसंत’ गुजरातमध्ये दाखल

इराण युद्ध आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे अनेक दिवस अडकून पडलेले भारतीय ध्वजधारी ‘जग वसंत’ हे जहाज अखेर भारतात पोहोचले आहे. भारतीय ध्वज असलेले हे जहाज आज म्हणजेच शुक्रवार, २७ मार्च रोजी सकाळी गुजरातमधील बंदरावर दाखल झाले.


गेल्या काही दिवसांत भारतीय ध्वजधारी ‘पाइन गॅस’ आणि ‘जग वसंत’ या दोन जहाजांनी होर्मुज सामुद्रधुनी पार केली होती. शिप ट्रॅकिंग डेटानुसार, मागील सोमवारी ही दोन्ही जहाजे इराणमधील लारक आणि केश्म बेटांदरम्यान दिसून आली होती. पश्चिम आशियातील युद्धामुळे होर्मुज सामुद्रधुनीत अडकलेल्या २२ भारतीय जहाजांपैकी ही दोन्ही जहाजे होती.


युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुज सामुद्रधुनी अंशतः बंद केल्याने जगभरातील तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ‘जग वसंत’ आणि ‘पाइन गॅस’ या जहाजांवर एकूण ९२,६१२ मेट्रिक टन एलपीजी गॅस भरलेली आहे. ‘जग वसंत’ जहाजावर ३३ भारतीय नाविक, तर ‘पाइन गॅस’वर २७ भारतीय नाविक कार्यरत आहेत.


यापूर्वी ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ ही भारतीय जहाजेही सुमारे ९२ हजार मेट्रिक टन एलपीजी घेऊन भारतात पोहोचली होती. भारतात घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी एलपीजीची मोठी मागणी असल्याने होर्मुज सामुद्रधुनी बाधित झाल्यानंतर देशात एलपीजी टंचाई निर्माण झाली होती. मात्र, भारत सरकारने कूटनीतिक पातळीवर इराणशी चर्चा करून भारतीय जहाजांच्या सुरक्षित हालचालीची व्यवस्था केली. इराणनेही अधिकृत निवेदन जारी करून भारतीय जहाजांना अडवले जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Gas Supply Changes : स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात होणार बदल

नवी दिल्ली : स्ट्रेट ऑफ होर्मुझ भागातील वाढत्या लष्करी आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने

Randhir Jaiswal : पीओजेकेतील निवडणुका दिखावा, मानवी हक्क उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न- रणधीर जयस्वाल

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर (पीओजेके) येथे घेतल्या जात असलेल्या तथाकथित विधानसभा

Narendra Modi : आसाममधील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची खासदारांसोबत आढावा बैठक

नवी दिल्ली : आसाममधील भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस, मालदेवतामध्ये २३३ मिमी पावसाची शक्यता देहरादून : उत्तराखंडमध्ये सक्रिय

Himachal Pradesh : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Suneel Anand Passed Away : अभिनेते देव आनंद यांच्या मुलाचे निधन; ज्या रुग्णालयात वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, तिथेच लेकाचाही मृत्यू

लंडन : हिंदी चित्रपटसृष्टीचे सदाबहार अभिनेते दिवंगत देव आनंद (Dev Anand) यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला