मोठी अपडेट; केंद्र सरकारकडून १० रुपयांनी डिझेलवरच्या एक्साइज ड्युटीत कपात

नवी दिल्ली: इराण-इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धसंघर्ष सुरू असताना आता केंद्रातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एक्साइज ड्युटीत कपात केली आहे. एकीकडे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या वर असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे.


ऐन संकटकाळात केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या खिशाचा विचार करत पेट्रोलवर ३ रुपये आणि डिझेलवर चक्क १० रुपये प्रति लिटर एक्साइज ड्युटीत कपात केली आहे. या निर्णयामुळे महागाईने होरपळणाऱ्या जनतेला मोठा आधार मिळणार का हे पाहावं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीही कपात करण्याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असताना भारतात मात्र काही ठिकाणी या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. एक्साइज ड्युटी कमी केल्यानंतर इंधन खरेदी करणाऱ्या कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम इंधनाच्या किमतींवर होईल, ज्यामुळे तेल कंपन्या आणि जनता या दोघांवरील भार कमी होईल. याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, जर तेल कंपन्यांनी किमती वाढवल्या नाहीत, तर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे किंवा कमी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी करणार सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवार २७ मार्च रोजी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ

'Jag Vasant' Ship : आनंदवार्ता! होर्मुज सामुद्रधुनीत अडकलेले भारतीय जहाज ‘जग वसंत’ गुजरातमध्ये दाखल

इराण युद्ध आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे अनेक दिवस अडकून पडलेले भारतीय ध्वजधारी ‘जग वसंत’ हे जहाज अखेर

Excise Duty on Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

कच्च्या तेलाच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न