Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी ट्रॅव्हल्सची डंपरशी भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, मृतांचा आकडा अधिकृतपणे १३ असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.



नेमकी घटना काय?


मिळालेल्या माहितीनुसार, 'हरिकृष्णा ट्रॅव्हल्स'ची ही बस तेलंगणातील निर्मल येथून आंध्र प्रदेशातील नेल्लोरकडे जात होती. आज (२६ मार्च) पहाटे सहाच्या सुमारास मार्कापुरम जिल्ह्यातील रायवरमजवळ बस आणि एका डंपरची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, क्षणार्धात बसने पेट घेतला. बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळण्यापूर्वीच आगीने रौद्र रूप धारण केले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पोलिसांनी सुरुवातीला मृतांची संख्या १४ सांगितली होती, मात्र नंतर मुख्यमंत्री कार्यालयाने १३ जणांच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा दिला आहे. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते, त्यापैकी २२ जण जखमी झाले आहेत. मार्कापुरमचे पोलीस अधीक्षक व्ही. हर्षवर्धन राजू यांनी सांगितले की, "अपघातात जखमी झालेल्या २२ जणांना, ज्यात डंपर चालकाचाही समावेश आहे, तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करत होते. घटनेचा पंचनामा सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे."



मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त


या भीषण अपघातावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी खोल दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रती त्यांनी संवेदना प्रकट केल्या असून, जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.


Comments
Add Comment

PM Modi - Meloni : ‘मोदींचा ऐतिहासिक महाविक्रम!’ थेट इटलीवरून आल्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. सलग सर्वाधिक

POK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणावाचा भडका; भीषण हिंसाचार, आंदोलने आणि नेमकी परिस्थिती काय?

Mumbai : पाकव्याप्त काश्मीर (PoK) सध्या एका भीषण अशांततेच्या काळातून जात आहे. रावळकोटसह अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये

मोदी युगाचा नवा अध्याय; नरेंद्र मोदी ठरले भारताचे सर्वाधिक काळ सलग कार्यरत पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. 10 जून रोजी सलग

Uri Blast : ‘उरीमधील भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद; गस्तीदरम्यान नियंत्रण रेषेजवळ घडली दुर्दैवी घटना

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन

PM Narendra Modi 'X' Post : 'जनसेवा हाच खरा धर्म'!; ऐतिहासिक विक्रमानंतर पंतप्रधान मोदींचं ट्वीट चर्चेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भारतीय राजकारणाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे.

PM Narendra Modi : भाजपाने नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषविल्याबद्दल दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग पदावर राहिलेले निवडून आलेले