Team India's Match Schedule : क्रिकेटचा मेगा सीझन! बीसीसीआयकडून भारतीय संघाचं २०२६-२७ चं वेळापत्रक जाहीर

- वेस्ट इंडिजपासून ऑस्ट्रेलियापर्यंत थरारक मालिकांची मेजवानी


मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआय कडून गुरुवारी (२६ मार्च) भारतीय संघाच्या २०२६-२७ च्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आगामी देशांतर्गत हंगामात रोमांचक आणि थरारक सामने पाहायला मिळणार आहेत. या हंगामात भारतीय संघ एकूण १७ शहरांमध्ये २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळतील.



वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याने हंगामाचा श्रीगणेशा :


या हंगामाची सुरुवात वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याने होईल, जो २७ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होईल. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि त्यानंतर पाच टी-२० सामन्यांचा समावेश असेल. एकदिवसीय सामने तिरुवनंतपुरम, गुवाहाटी आणि न्यू चंदीगड येथे खेळले जातील, त्यानंतर टी-२० सामने लखनौ, रांची, इंदूर, हैदराबाद आणि बंगळूरु येथे आयोजित केले जातील.



वेस्ट इंडीजचा भारत दौरा :



  • पहिला एकदिवसीय सामना : २७ सप्टेंबर, तिरुवनंतपुरम

  • दुसरा एकदिवसीय सामना : ३० सप्टेंबर, गुवाहाटी

  • तिसरा एकदिवसीय सामना : ३ ऑक्टोबर, न्यू चंदीगड

  • पहिला टी-२० सामना : ६ ऑक्टोबर, लखनऊ

  • दुसरा टी-२० सामना : ९ ऑक्टोबर, रांची

  • तिसरा टी-२० सामना : ११ ऑक्टोबर, इंदूर

  • चौथा टी-२० सामना : १४ ऑक्टोबर, हैदराबाद

  • पाचवा टी-२० सामना : १७ ऑक्टोबर, बंगळूर


त्यानंतर भारत डिसेंबर २०२६ मध्ये श्रीलंकेचे यजमानपद भूषवेल. या मालिकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने असतील. एकदिवसीय सामने दिल्ली, बंगळूर आणि अहमदाबाद येथे, तर टी-२० सामने राजकोट, कटक आणि पुणे येथे खेळले जातील.



श्रीलंकेचा भारत दौरा :



  • पहिला एकदिवसीय सामना : १३ डिसेंबर, दिल्ली

  • दुसरा एकदिवसीय सामना : १६ डिसेंबर, बंगळूर

  • तिसरा एकदिवसीय सामना : १९ डिसेंबर, अहमदाबाद

  • पहिला टी-२० सामना : २२ डिसेंबर, राजकोट

  • दुसरा टी-२० सामना : २४ डिसेंबर, कटक

  • तिसरा टी-२० सामना : २७ डिसेंबर, पुणे


नवीन वर्षाच्या सुरुवातीला, झिम्बाब्वे संघ जानेवारी २०२७ मध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा करेल. हे सामने कोलकाता, हैदराबाद आणि मुंबई येथे खेळले जातील.


या हंगामाची सांगता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेने, म्हणजेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीने होईल. ही मालिका २१ जानेवारी २०२७ रोजी नागपूर येथे सुरू होईल. त्यानंतर चेन्नई, गुवाहाटी, रांची आणि अहमदाबाद येथे सामने खेळवले जाणार आहेत.

Comments
Add Comment

धक्कादायक! टी20 वर्ल्ड कप तिकीट काळाबाजारप्रकरणी माजी क्रिकेटपटूसह ६ जणांना अटक

मुंबई : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. यावर्षी भारत आणि श्रीलंका येथे टी20

IPL 2026 : हंगामाच्या मध्यावर सनरायझर्सला मिळणार पॅट कमिन्सची साथ ?

मुंबई : आयपीएल २०२६ च्या आधी पॅट कमिन्सबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२

सौरव गांगुली बनला जॅक्सन ग्रुपचा पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यासह शाश्वत विकासाला गती देणार मुंबई : जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या