Sonia Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक मंगळवारी रात्री बिघडली. तात्काळ त्यांना सर गंगाराम रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.


काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना सर गंगाराम रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र राहुल गांधी आणि कन्या प्रियंका गांधी देखील उपस्थित आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.


काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना छातीच्या त्रासामुळे नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली असून, डॉ. अनुप बसू त्यांच्या उपचारांवर देखरेख करत आहेत. उपचारादरम्यान आपल्या आईच्या जवळ राहण्यासाठी प्रियांका गांधी रुग्णालयात उपस्थित आहेत. वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.


श्वासाच्या त्रासामुळे पूर्वीही रुग्णालयात दाखल
जानेवारी महिन्यातही काँग्रेसच्या माजी अध्यक्षांना सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की, थंड हवामान आणि पर्यावरणातील प्रदूषण या दोन्हींच्या एकत्रित परिणामामुळे त्यांचा दम्याचा त्रास किंचित वाढला होता.

Comments
Add Comment

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे...

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अधिवेशनात जाहीर होणार.. उपाध्यक्षांच्या पुढाकारानंतर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या खरेदीसाठी संस्थांच्या उड्या; प्रति हजार लिटरसाठी १५ रुपयांचा दर आकारला जाणार

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलजल प्रक्रिया

Kalyan: नागरिकांच्या घरांवर फेकले सुतळी बॉम्ब; कल्याणमधील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

मुंबई: कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

वकिलांना ३ महिने काळ्या कोटापासून मिळणार सुट्टी; जाणून घ्या कारण

पुणे : वाढत्या उष्णतेमुळे वकिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या काळात पारंपरिक काळा