पुणे - अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ‘ॲप’चा वापर

पुणे : शहरात होणारी अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अमली पदार्थांची तस्करी अणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून आता ॲपचा (उपयोजन) वापर करण्यात येणार असून, या ॲपवर माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. कारवाई करणाऱ्या पोलीस पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तक्रारदाराचे नाव समजणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.


शहरातील अमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीवरील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. या कारवाईत नागरिकांकडून देण्यात येणाऱ्या माहितीचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी खास ॲप तयार करण्यात येणार आहे. शहरातील वस्ती भाग, तसेच उच्चभ्रू भागात छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री होते. नागरिकांनी ज्या भागात अमली पदार्थांची विक्री होते. त्या भागाचे छायाचित्र, प्रत्यक्ष ठिकाण (लोकेशन), चित्रफीत या ॲपवर पाठवावी. ही माहिती पाठविल्यास पोलीस आयुक्तालयातील विशेष अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचणार आहे.

Comments
Add Comment

पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

पुणे : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सुरू केलेल्या ‘पीटीपी’ (पुणे ट्रॅफिक पोलिस) अॅपच्या माध्यमातून

एलपीजी सिलिंडर आता २५ दिवसांनी नाही तर एवढ्या दिवसांनी बुक करता येणार

मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या झळा आता भारताला तीव्र बसायला लागल्या आहेत. कुठे इंधनाचा पुरवठा अपुरा

अशोक खरातने सहा महिने..., आणखी एका तरुणीचा खळबळजनक आरोप

नाशिक: महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात

Ashok Kharat: न्यायालयात बोलताना जादुटोणाबाबत काय म्हणाला अशोक खरात?

मुंबई: महिलांवर लैंगिक अत्याचार आणि तंत्र-मंत्राचा वापर करीत अमानुष अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याला

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त राजगुरुनगर येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमध्ये गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस