एलपीजी सिलिंडर आता २५ दिवसांनी नाही तर एवढ्या दिवसांनी बुक करता येणार

मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या झळा आता भारताला तीव्र बसायला लागल्या आहेत. कुठे इंधनाचा पुरवठा अपुरा पडतोय तर कुठे गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवतो आहे. गॅस सिलिंडरसाठी अक्षरश: भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोक तासंतास उभं राहून गॅस सिलिंडर घेत आहेत. तुम्ही घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅस कंपन्यांनी आता सिलिंडर बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


नव्या नियमांनुसार, ग्राहकांना ठराविक कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या सिलिंडरसाठी बुकिंग करता येणार नाही. विशेषतः इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी आता बुकिंगमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. ज्या ग्राहकांकडे डबल सिलिंडर कनेक्शन आहे, त्यांना आता एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी किमान ३५ दिवस वाट पाहावी लागेल. यापूर्वी ही मर्यादा २५ दिवसांची होती. गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्वांना वेळेवर पुरवठा व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.



उज्ज्वला लाभार्थी आणि ग्रामीण भागासाठी वेगळे नियम


गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या श्रेणीनुसार वेगवेगळे नियम लावले आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता पुढच्या बुकिंगसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल. सिंगल सिलिंडर कनेक्शन म्हणजे ज्याच्याकडे एकच गॅस सिलिंडर आहे, ते डिलिव्हरीनंतर २५ दिवसांनी नवीन बुकिंग करू शकतील. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा नियम अधिक कडक केले आहेत.


त्यांना पुढील बुकिंगसाठी ४५ दिवसांचे अंतर ठेवणे अनिवार्य आहे. OTP आणि e-KYC हे महत्त्वाचं असेल. डिलिव्हरीच्या वेळी ओटीपी सांगणं आता बंधनकारक आहे. तसेच, ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचे बुकिंग रद्द केले जाऊ शकते.



१२ सिलिंडरचा कोटा संपला तर काय होणार?


सरकार एका वर्षात १२ सिलिंडरवर सबसिडी देते. जर एखाद्या ग्राहकाने आपला हा कोटा पूर्ण केला असेल, तर १३ व्या सिलिंडरसाठी त्यांना गॅस कंपनीच्या ॲपवर जाऊन काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. यामध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या, घरी पाहुणे आले आहेत का किंवा घरात काही कार्य आहे का, अशी माहिती द्यावी लागेल. या माहितीची पडताळणी केल्यानंतरच कंपनी अतिरिक्त सिलिंडर देण्याचा निर्णय घेईल.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम