महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांचा झाला टाय टाय फिश; पाणी पट्टी वाढवल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न, आयुक्तांनी काढली हवा

मुंबई: मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात बसलेल्या उबाठाच्या नगरसेवकांचा आपण सक्षम विरोधी पक्ष असल्याचे सिद्द करण्याचा प्रयत्न करत असून पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या मुद्दयावर निवेदन करत सभागृहात वातावरण निर्मिती करण्यास गेलेल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा टाय टाय फिश झाला आहे. मुंबईकरांवर पाणी पट्टीत ८ टक्के दरवाढ लादणे योग्य नसून हा वाढीव बोजा टाकण्यात येवू नये अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केला होता, परंतु अशाप्रकारची कोणतीही दरवाढ केली नाही आणि प्रस्तावितही नाही असे उत्तर प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी केल्यामुळे त्यांच्या निवेदनाची हवाच निघून गेली.


मुंबई महापालिकेच्या सभेमध्ये विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी करात ८ टक्के इतकी वाढ लादण्याचा हळूवार प्रयत्न केल्याचे दिसून येत असल्याचे सांगत अशाप्रकारचा कोणताही कर लावला जाणार नाही असे महापौरांनी सांगूनही प्रशासनाने याला थेट छेद दिल्याचा आरोप निवेदनाने केला. या निवेदनावरील प्रत्येक मुद्दयाची चिरफाड करत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी त्यांचा समाचार घेतला. मुंबईत विविध प्रकल्प कामे सुरु करून त्याला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारची करवाढ आणि दरवाढ या अर्थसंकल्पात केली जात नाही असे आश्वासन दिले. त्यामुळे मुंबईला पाणी देण्याची जबाबदारी आमची असून ८ टक्के पाणीपट्टीत वाढ झालेली नाही. त्यामुळे राजकीयदृष्ट्या दिशाभूल करण्याच्या हेतूने विरोधी पक्षनेत्यांनी हे निवेदन केल्याचे सांगितले. सन २०१२मध्ये या दरवाढी एकाच वेळी मान्यता दिली होती, परंतु तेव्हापासून ८ टक्के दरवाढ केव्हाही पूर्ण झालेली नाही.


तर काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी पाण्याच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी अभय योजना राबवली जाणे आवश्यक असल्याचे सांगत ८० टक्के इमारतींना आजही टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.


तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी अनधिकृत जलजोडणी आणि पाणी गळती ही समस्या एका दिवसाची नसून केवळ राजकीय हेतून प्रेरित होवून विरोध करू नये. तर महापौर रितू तावडे यांच्या नावाचा उल्लेख विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या निवेदनामध्ये केल्यामुळे मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करतानाच ८ टक्के दरवाढीला स्थगिती देण्याचे जाहीर केले. पण त्यानंतर दरवाढ झालेलीच नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेत्याने प्रशासनाकडून आधी माहिती घेवून निवेदन करायला पाहिजे होते असे सांगितले. यावर प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी कोणतीही नवीन पाण्याची दरवाढ प्रस्तावित नसून अर्थसंकल्पातही अशाप्रकारची करवाढ आणि दरवाढ केलेली नाही असे सांगत विरोधी पक्षनेत्यांच्या निवेदनाची हवा काढली.

Comments
Add Comment

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा

Devendra Fadnavis : गर्भवती मातांसाठी मोठी दिलासादायक बातमी; तीव्र रक्तक्षयावर उपचारांना मिळणार वेग

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या