मेट्रो-११ मार्गिकेच्या कामाला वेग, 'जायका'कडून ५ हजार ५०० कोटींचे कर्ज

मुंबई : वडाळ्यातील आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो ११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. या मार्गिकेसाठी सुमारे २३ हजार ४८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम कर्ज आणि दुय्यम कर्जातून उभारली जाणार आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने (जायका) ५ हजार ५०० रुपयांचे कर्ज दिले आहे. जपानी अधिकृत विकास सहाय्य (ओडीए) कर्जरुपाने हे कर्ज देण्यात आले. यामुळे प्रकल्पाच्या कामाला येणार वेग येणार आहे.


केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव आलोक तिवारी आणि जेआयसीए इंडिया कार्यालयाचे मुख्य प्रतिनिधी टेकुची ताकुरो यांनी नवी दिल्लीत या कर्जाच्या करारावर नुकतीच स्वाक्षरी केली. जायकाकडून ५ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्याने मेट्रो-११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. वडाळा - ठाणे - कासारवडवली मेट्रो-४ मार्गिकेचा विस्तार वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान मेट्रो-११ मार्गिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यानुसार आणिक आगार, वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया अशी १७.५१ किमीची ही भुयारी मार्गिका असणार असून यात १४ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. १४ मेट्रो स्थानकांपैकी एक स्थानक उन्नत असणार असून उर्वरित १३ स्थानके भुयारी असणार आहेत. या मार्गिकेस राज्य सरकारने मान्यता दिली असून आता या प्रकल्पाच्या प्रस्तावास केंद्र सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन

मुंबईतील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा

मुंबई: मुंबईमधील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चे कलम १५४ मध्‍ये सुधारणा

तीन कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी मुंबईचे सह-दुय्यम निबंधक निलंबित

मुंबई : शासनाचे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी

आरेतील बेकायदा बांधकामांवर आता 'सॅटेलाईट' नजर; 'नेत्रम' ॲपद्वारे अतिक्रमणांचा होणार बिमोड

पालकमंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती; दोषी अधिकाऱ्यांवरही उगारणार बडगा मुंबई : आरे दुग्ध

नोंदणी सेवेतील लायसन्स नूतनीकरणासाठी अलर्ट प्रणाली; माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयांतर्गत होणारे आधार-आधारित व्यवहार भविष्यात खंडित होऊ नयेत,