आनंदाची बातमी, नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार

बेलापूर : नवी मुंबई विमानतळ माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाला. या विमानतळावरून २९ मार्च २०२६ पासून दररोज ७६ विमानसेवा उपलब्ध होणार आहेत. विमानसेवांची संख्या वाढत असल्यामुळे नवी मुंबई विमानतळावरील प्रवासी वर्दळही वाढणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे नियोजन वेगाने सुरू आहे. विमानतळावर एक पॅसेंजर इंटरजेंज तयार करण्याचे नियोजन आहे. या इंटरजेंजद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चार मेट्रो मार्गिकांशी जोडला जाईल.


मुंबई शहर ते नवी मुंबई अशी धावणार असलेली मेट्रो ८ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस दोनपासून ही मार्गिका सुरु होईल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाईल. मेट्रो आठ वरील स्थानकावर मेट्रो ७ आणि मेट्रो ३ ला जोडणी मिळेल. मेट्रो आठवरून प्रवाशांना मेट्रो ४, मेट्रो २ आणि नवी मुंबई मेट्रो लाईन १ साठी इंटरचेंज मिळणार आहेत.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला चार मेट्रो मार्गिकांळशी जोडणी मिळाल्यामुळे प्रवासी मेट्रोद्वारे कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, मानखुर्द येथील आंतरराज्य बस टर्मिनसपर्यंत पोहोचू शकतील. सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणतेही रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी, कॅब हे खर्चिक पर्याय वापरूनच विमानताळवर पोहोचता येते अथवा विमानतळावरून पुढे घराच्या अथवा हॉटेलच्या दिशेने प्रवास करावा लागतो. यात वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. कनेक्टिव्हिटी मिळाल्यावर प्रवाशांच्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई

BMC News : डॉ.भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी इंटॅकवरच; करार संपून आठ वर्षांचा लोटला कालावधी

नवीन संस्थेची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरु https://prahaar.in/2026/08/14/46-trees-affected-by-the-redevelopment-of-ramabai-and-kamraj-nagar-in-ghatkopar-mmrda-to-plant-955-trees/ मुंबई (विशेष

MMRDA : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरच्या पुनर्विकासात ४६ झाडे बाधित; एमएमआरडीएकडून ९५५ झाडे लावून घेतली जाणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरमधील झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी हाती घेण्यात