नाशिकमधील खिर्डीसाठे, डोंगरगाव आणि खडकओझर प्रकल्पांचा कायापालट होणार

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील अनेक दशके जुन्या असलेल्या खिर्डीसाठे, डोंगरगाव आणि खडकओझर या लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले आहे. या प्रकल्पांच्या दुरुस्तीमुळे शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या गळतीला लगाम बसणार असून, परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार पंकज भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या प्रकल्पांच्या दुरवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार किशोर दराडे यांनीही उपप्रश्न विचारून नाशिकमधील सिंचन सुविधांच्या सक्षमीकरणाची मागणी केली.


कालव्यांचे मजबुतीकरण आणि आस्तरीकरण


मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, खिर्डीसाठे लघु पाटबंधारे प्रकल्प हा १०० वर्षांहून अधिक जुना आहे, तर डोंगरगाव आणि खडकओझर प्रकल्प ५० ते ६० वर्षांपूर्वीचे आहेत. प्रदीर्घ काळामुळे या प्रकल्पांच्या कालव्यांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली असून पाणी गळतीचे प्रमाण वाढले होते. आता या दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत कालव्यांचे मजबुतीकरण आणि आस्तरीकरण (Lining) करण्यात येणार आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय टळून शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्याला पाणी मिळणे सुलभ होणार आहे.


शेतकऱ्यांना मिळणार दिलासा


हे तलाव प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून, त्यांची साठवण क्षमता आणि वहन क्षमता वाढल्यास नाशिकमधील शेतीला मोठे बळ मिळेल. दुरुस्ती खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती तांत्रिक कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास

Buldhana Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकची समोरील वाहनाला धडक; चालकाचा जागीच मृत्यू, क्लिनर जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरुच असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास आणखी एक भीषण अपघाताची

Simhastha Kumbh Mela 2027 : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग ! नाशिकरोड स्थानकावर २४ बोगी गाड्या प्लॅटफॉर्म एकवर लागणार

Simhastha Kumbh Mela 2027 : आगामी सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकासकामांचा धडाका सुरु आहे. कुंभमेळ्याच्या

Mark Zuckerberg : पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ काढणं मेटाला महागात पडणार? मार्क झुकरबर्गना संसदीय समितीचा ३ दिवसांचा अल्टिमेटम; “माफी मागा अन्यथा…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून (Facebook)

Pakistan : पाकिस्तानने सीमेवर तैनात केल्या चिनी तोफा, भारत सावध; राष्ट्रहितासाठी योग्य ती कारवाई करू, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताशी खेटून असलेल्या सीमेवर चिनी तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. काही