Iran-US-Israel War : इराणसोबत सकारात्मक चर्चा, ट्रम्प यांच्याकडून लष्करी हल्ल्यांना तात्पुरती स्थगिती

अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या २५ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. मात्र या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबण्याचे संकेत दिले आहेत. सोमवारी ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट शेअर करत सांगितले की, अमेरिकेची इराणसोबत सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा झाली असून, इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर कोणताही लष्करी हल्ला करण्यास सैन्याला तात्पुरता स्थगिती देण्याचे आदेश दिले जाणार आहेत.


ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात मध्य पूर्वेतील परस्पर वैर पूर्णपणे समाप्त करण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या आणि फलदायी चर्चा झाल्याची माहिती देताना मला आनंद होत आहे.”पुढे त्यांनी म्हटले, “या सखोल, विस्तृत आणि सकारात्मक चर्चांचा सूर आणि वातावरण लक्षात घेता ज्या संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील मी युद्ध विभागाला निर्देश दिले आहेत की, इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी पुढे ढकलावेत.”या निर्णयाबाबत पुढील घडामोडींवर भाष्य करत ट्रम्प म्हणाले, “हा निर्णय सुरू असलेल्या बैठका आणि चर्चांच्या यशावर अवलंबून असेल. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!”


यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुज पूर्णपणे खुला करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्यांनी इशारा दिला होता की, ठरलेल्या मुदतीत होर्मुज मार्ग खुला न केल्यास इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला जाईल.त्यावर प्रत्युत्तर देताना इराणने म्हटले होते की, “जर अमेरिकेने इराणच्या वीज नेटवर्कला लक्ष्य केले, तर इराण इस्रायलच्या वीज प्रकल्पांवर तसेच आखाती प्रदेशातील अमेरिकन तळांना वीज पुरवठा करणाऱ्या प्रकल्पांवर हल्ला करेल.”


ट्रम्प यांचा ४८ तासांचा अल्टिमेटम मंगळवार, २४ मार्चच्या सुरुवातीला संपणार होता. मात्र त्याआधीच ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत वीज प्रकल्पांवरील संभाव्य हल्ला सध्या पाच दिवसांसाठी स्थगित केल्याची घोषणा केली.

Comments
Add Comment

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेच्या अपयशासाठी इराणने अमेरिकेला धरले जबाबदार

पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील निष्फळ झालेल्या चर्चेनंतर, इराणने म्हटले आहे की, वाटाघाटी अजून संपलेल्या नाहीत.

Iran-US Peace Treaty : ४० दिवसांच्या संघर्षाची २१ तास चाललेली चर्चा निष्फळ; जे.डी. व्हान्स पाकिस्तानमधून तातडीने निघाले, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) येथे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली बहुचर्चित शांती चर्चा अखेर

Iran-US Peace Treaty : अमेरिका-इराणचे शिष्टमंडळ दाखल, इराणच्या चार प्रमुख मागण्या

शस्त्रसंधी चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची शिष्टमंडळे पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिकन

Chimpanzees Civil War : सातासमुद्रापार सेंट्रल, वेस्टर्नचा संघर्ष पेटला, एकेकाळी मित्र असलेले घेतायत एकमेकांचा जीव

कंपाला : एकेकाळी एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं राहणारे चिम्पांजी एकेमकांच्या जीवावर उठल्याचा प्रकार घडला आहे.

Melania Trump On Epstein Files : एकीकडे युद्ध सुरु असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने सोडले 'एपस्टईन फाइल्स' विषयी मौन; म्हणाल्या...

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एपस्टईन फाइल्सविषयी (Epstein Files) अखेर अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने मौन सोडलं

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेपूर्वी तणाव शिगेला! अमेरिकेच्या 'त्या' कृतीची आठवण करून देत इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल

अमेरिकेसोबत होणाऱ्या महत्त्वाच्या शांतता चर्चेसाठी इराणचे ७१ सदस्यीय शिष्टमंडळ शुक्रवारी (१० एप्रिल) उशिरा