बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ उबाठांमुळे काँग्रेसचा गुलाम - नवनाथ बन

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या वेळचा ढाण्या वाघ आता उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या कारकीर्दीत वाघाचे कातडे पांघरून काँग्रेसचा गुलाम झाला आहे. खुर्चीसाठी उद्धव सेना काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झालेले मतदारांनी पाहिल्यामुळेच, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उबाठा गटाला मतदारांनी घरी बसवले. राऊतांनी इतरांना मांजर म्हणण्याच्या फंदात न पडता उबाठा गटाचे झालेले मातेरे सावरावे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवेळी जे काही झाले ते हाताळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती समर्थ आहे, राऊतांना त्यात नाक खुपसण्याची गरज नाही. लोकशाहीच्या गप्पा राऊतांनी मारूच नये त्यांना तो अधिकारच नाही असे बन यांनी खडसावले. साता-यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असताना काही लोकांनी जाणूनबुजून वेगळ्या पक्षांशी संगनमत करण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे प्रकरण घडले असे ते म्हणाले.


महायुतीची चिंता करणा-या राऊतांना खडे बोल सुनावत बन म्हणाले की राऊतांनी उबाठा गटातील गटातटाचे राजकारण, उद्धव ठाकरे आणि खुद्द राऊत यांच्यातील संघर्ष मिटवण्याकडे लक्ष द्यावे. ज्यांना स्वत:च्या पक्षातील भांडणे, तंटे, संघर्ष सोडवता येत नाहीत त्यांनी महायुतीच्या अस्तित्वाची चिंता करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती भक्कम असून कोणीही त्याला खिंडार पाडू शकत नाही असेही त्यांनी नमूद केले.


यावेळी बन म्हणाले की, महायुती सरकार हे ११ कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे स्पष्ट बहुमताने आलेले सरकार आहे, पाठीत खंजीर खुपसून, विश्वासघात करून आलेल्या मविआ सरकारसारखे नाही. मविआ सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे, राऊतांना सचिन वाझे तसेच अनेक अट्टल गुन्हेगारांना पाठीशी घालावे लागले होते. महायुती सरकार भरभक्कम असून सरकार टिकवण्यासाठी कुणालाही पाठीशी घालण्याची गरज भासत नाही.


सध्याच्या युद्धस्थितीमुळे निर्माण झालेला गॅस आणि इंधन तुटवड्याच्या समस्येकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील एनडीए आणि महायुती सरकार डोळ्यात तेल घालून बघत असून ती समस्या सोडवण्यासाठी युद्धस्तरावर काम करत आहेत. साठेबाजांवर, काळाबाजार करणा-यांवरही कठोर कारवाई केली जात आहे. कोणावरही रिकामे गॅस सिंलेंडर वाजवायची वेळ येणार नाही. राज्यातील सूज्ञ जनतेने मात्र वेळोवेळी झालेल्या निवडणुकांमध्ये उबाठा गटाला योग्य जागा दाखवत केवळ टाळ्या वाजवण्याचे काम राऊतांसाठी शिल्लक ठेवले आहे या शब्दांत बन यांनी खिल्ली उडवली.


फुटकळ टीका करण्यापेक्षा राऊतांनी पायाखाली काय जळतेय ते पहावे. देशामध्ये शांती आहे मात्र उबाठा गटात संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या दोन गटात पेटलेले युद्ध राऊतांनी आधी शमवावे आणि मग इराण इस्रायल युद्धाचे भारतावर उमटलेल्या पडसादांबद्दल मोदी सरकार, महायुती सरकारला शहाजोग सल्ले द्यावे असे बन यांनी सुनावले. संपूर्ण जगाला युद्धाच्या झळा बसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे भारताला झळा जाणवल्या नाहीत. अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या असल्यातरी भारतात मात्र किमती आवाक्यात ठेवू शकलो कारण, देशाची काळजी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थ आहेत असे ही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Ulhasnagar Crime : उल्हासनगर हादरले! आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या गोळ्याला संपवले; आईकडून २० वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या

Ulhasnagar : उल्हासनगरमधून एक अतिशय हादरवून टाकणारी आणि तितकीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्या जातीच्या

Nashik Kumbhmela : गर्दी व्यवस्थापनासाठी मास्टर प्लॅन; मार्चपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न; शेखर सिंहांची माहिती

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला आता वेग आला आहे. रस्ते, घाट, वाहतूक, विमानतळ,

Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर

४ ऑगस्टच्या यादीला ब्रेक; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय मुंबई : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर

Minister Nitesh Rane : महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात