PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) मधील अडथळा कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचे ठामपणे सांगितले.


पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे नमूद करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्या भागात सुमारे १ कोटी भारतीय राहतात आणि कार्यरत आहेत. या मुद्द्यावर देशात सर्वपक्षीय एकमत असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांनी विविध देशांच्या नेत्यांशी संवाद साधल्याची माहितीही यावेळी दिली.


युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३.७५ लाखांहून अधिक भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यात आले असून, इराण मधून सुमारे १,००० भारतीयांना परत आणले गेले आहे. यामध्ये अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा, गॅसचा, खतांचा आणि इतर ऊर्जा स्त्रोतांचा मोठा हिस्सा या मार्गावर अवलंबून आहे. युद्धामुळे जहाजांच्या हालचालींमध्ये अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी देशातील इंधनपुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.


भारत आपल्या एलपीजी गरजांपैकी सुमारे ६० टक्के आयातीवर अवलंबून असल्याचे सांगत त्यांनी घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावरही भर दिला जात असल्याचे मोदींनी सांगितले.





पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, आंतरराष्ट्रीय जलमार्गात अडथळे निर्माण करणे, व्यापारी जहाजांवर हल्ले करणे आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर आघात करणे अस्वीकार्य आहे. भारत नेहमीच शांतता आणि संवादाच्या बाजूने उभा राहिला असून, कूटनीतीच्या माध्यमातून तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


या युद्धाचा परिणाम दीर्घकालीन राहू शकतो, त्यामुळे देशाने एकजूट राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करत त्यांनी सांगितले की, भारत सर्व संबंधित देशांशी संपर्क ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे.

Comments
Add Comment

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या