दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई करत एकूण १२ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत हंदवाडा, कुपवाडा, कुलगाम, रफियाबाद आणि सोपोर या भागांचा समावेश होता.


हंदवाडा जिल्ह्यातील गुलोरा परिसरात एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरावर एनआयएच्या पथकाने छापा टाकला. अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी सखोल झडती घेत कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर संशयास्पद साहित्याची तपासणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, पथकाने पहाटेच कारवाई सुरू केली होती. यापूर्वीही दिल्लीतील स्फोट प्रकरणाच्या अनुषंगाने एनआयएने काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली होती. काजीगुंड, शोपियां आणि पुलवामा या भागांमध्ये संशयितांच्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली होती. या कारवाईत डॉ. अदील, जासिर बिलाल, मौलवी इरफान, डॉ. मुझम्मिल आणि आमिर रशीद यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता.


दरम्यान, दिल्लीतील लाल किला मेट्रो स्थानकाजवळ १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात एका जिहादी दहशतवाद्याने कारमधून स्वतःला उडवून दिले होते. या घटनेनंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात

UGC : अमली पदार्थविरोधी अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)

Cough Syrup Warning For Kids : लहान मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी

नवी दिल्ली : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी-खोकल्यावरील

BRICS : ब्रिक्स प्लस देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी 'न्यायनॉमिक्स' अन् 'न्याय सेतू'

नवी दिल्ली :  ११ व्या ‘ब्रिक्स प्लस लिगल फोरम’च्या उद्घाटनाप्रसंगी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत

LPG Pipeline : देशातील सहा राज्यांमध्ये LPG पाइपलाइनचा विस्तार, केंद्राकडून ७ हजार कोटींची गुंतवणूक आणि १,८०० किमी नव्या पाइपलाइनला मंजुरी

नवी दिल्ली : देशातील एलपीजी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.