Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना तुमचा मोबाईल पूर्णपणे बंद राहणार आहे. सर्व प्रकार समोर येताच प्रवाशांमध्ये गोंधळाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


गेल्या काही दिवसांपासून मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून भुयारी मेट्रोनेही असंख्यजण प्रवास करत आहेत. पण भुयारी मेट्रोच्या दक्षिण मुंबईतील स्थानकांत प्रवाशांना इंटरनेट सेवेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अजूनही या स्थानकांच इंटरनेट सेवा सुरु झाली नाही. आता दुसऱ्या बाजूला आरे ते बीकेसीपर्यंत सुरु असलेली इंटरनेट सेवाही आता बंद करण्यात आलेली आहे.



नेमकं कारण काय?



समोर आलेल्या माहितीनुसार,जी इंटरनेटसाठी यंत्रणा उभी करणारे कंत्राटदार होते, त्यातील कंत्राटदराने कंत्राटातील अटी आणि शर्थींचे उल्लंघन केले असल्याने एमएमआरसीएलने हे कंत्राट रद्द केले आहे.


मेट्रो ३ आरे ते कफ परेड ही भुयारी मार्गिका ३३.५ किमीची असून ऑक्टोबर २०२४ मध्ये आरे ते बीकेसी हा टप्पा सुरु करण्यात आलेला होता. मग यानंतर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा २०२५ मध्ये सुरु करण्यात आला आणि त्यात सर्व भुयारी मार्गिकांमध्ये इंटरनेट सेवा देण्यात आली होती. मात्र आता काही महिन्यात सुरु करण्यात आलेल्या आचार्य आत्रे ते कफ परेड या शेवटच्या टप्प्यात इंटरनेट सेवा सुरु करण्यात आलेली नाही.


यावर पर्याय म्हणून लवकरच नव्याने ही यंत्रणा उभारण्यासाठी पुन्हा एकदा निविदा काढली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारी संपर्क यंत्रणा भुयारी मेट्रो स्थानकांत उपलब्ध असल्याचे एसएसआरसीएलकडून सांगण्यात आलेले आहे.


आरे ते वरळी या पहिल्या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर एअरटेल आणि वोडाफोन तसेच जिओचे नेटवर्क प्रवाशांसाठी उपलब्ध होते. परंतू नेटवर्कची यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीकडून जास्त प्रमाणात शुक्लाची मागणी केली जात असल्याचे कारण देत या कंपन्यांनी माघार घेतल. मग परत काही कंपन्यांची सेवा पुन्हा सुरु करण्यात एमएमआरसीएलला यश आले. मात्र आता ही यंत्रणा उभारणारी कंपनी तसेच सेवा पुरवठादार कंपन्यांमधील मतभेद कायम राहिलेले आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.

उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने

Navi Mumbai: शिक्षिकेचं भयंकर कृत्य; दोन विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेतील

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका

'जैन समाजाची सेवा, त्याग, अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी'

मुंबई : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी