LPG Cylinder: गॅस सिलिंडर बुक होत नसेल तर कुठे तक्रार कराल? 'या' हेल्पलाईन नंबरवर तात्काळ मिळेल मदत

मुंबई: मागील काही दिवसांपासून अनेक लोकांना एलपीजी सिलिंडर बुक करताना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे. सिलिंडर बुक झाल्यावर त्याची डिलिव्हरी होत नसल्याच्या तक्रारी काही ग्राहकांनी केल्या आहेत. त्यामुळे लोकांना गॅस एजन्सित अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत. जर तुम्हालाही सिलिंडर बुक करण्यापासून डिलिव्हरी पर्यंतच्या समस्या जाणवत असतील, तर खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.



सिलिंडर बुक करताना का येतात अडचणी?


'नवे नियम' हा बुकिंग न होण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे.सरकारने नुकतच गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी बुकिंग नियमांमध्ये बदल केलाय. त्यामुळे आता घरगुती गॅस सिलिंडरमध्ये कमीत कमी 25 दिवसांचा गॅप अनिवार्य केला आहे. तुम्ही जर आताच सिलिंडर घेतलं असेल, तर २५ दिवस पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला दुसरं सिलिंडर बुक करता येणार नाही.याशिवाय अनेकदा मोबाईल अॅप किंवा वेबसाईटवर अनेक लोकांचा वापर वाढल्याने सिस्टम स्लो होतं. यामुळे बुकिंगमध्ये समस्या येते.


जर तुमची गॅस एजन्सी तुमची समस्या समजून घेत नसेल किंवा जाणूनबुजून उशिर करत असेल, तर तुम्ही थेट PG Portal वर तक्रार दाखल करू शकता. हे एक सरकारी प्लॅटफॉर्म आहे. जिथे तुमची तक्रार थेट संबंधीत विभागापर्यंत पोहोचू शकते आणि त्यावर योग्य ती कार्यवाही होऊ शकते.


PG Portal वेबसाईट ओपन करा.
तुमचं अकाऊंट बनवा किंवा लॉग ईन करा.
'Lodge Public Grievance' वर क्लिक करा.
'Ministry of Petroleum and Natural Gas'च्या ऑप्शनवर क्लिक करा.
इथे एलपीजीच्या समस्यांबाबत लिहा.
ग्राहक क्रमांक आणि एजन्सीची माहिती टाकून सबमीट करा.



तातडीनं मदत मिळण्यासाठी हेल्पलाईन नंबर


जर तुम्ही ऑनलाईन पद्धत वापरत नसाल, तर गॅस कंपनीच्या टोल-फ्री नंबरवरही कॉल करू शकता.


Indane Gas: 1800-2333-555
HP Gas: 1800-2333-555
Bharat Gas: 1800-22-4344

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास