Jalgaon: प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला विवस्त्र करुन काढली धिंड; जळगावमधील क्रूर घटना

जळगाव: प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला नग्न करून बेदम मारहाण करून त्याची गावभर धिंड काढल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात समोर आला आहे. या घटनेत पोलिसांनी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. जखमी तरुणाला रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


भुसावळ तालुक्यातील खडका गावातील चेतन दिलीप जंगले या तरुणाने आपल्याच समाजातील धनश्री पाटील या तरुणीशी नाशिक पंचवटी येथे जाऊन प्रेम विवाह केला, मात्र हा विवाह मुलीच्या माहेरच्या लोकांना मान्य नव्हता, विवाह झाल्याच्यानंतर चेतन जंगले हा त्याच्या पत्नीसह त्याच्या नातेवाईकांच्याकडे आल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी खडका गावात जाऊन चेतन जंगले सह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी त्याला नग्न करून गावात धिंड काढल्याचा ही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावर गावातील काही जणांनी मध्यस्थी करून त्याची सुटका केली, त्यामुळे अनर्थ टळला असला तरी, या संपूर्ण घटनेने समाज मन सुन्न झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,पोलिसांनी तातडीने मारहाण करणाऱ्या दहा बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.


तर मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाला नग्न करून खांबाला बांधून मारहाण केल्याची ही खळबळजनक घटना भुसावळ तालुक्यात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील तरुण- तरुणीने १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली आणि दोघे जण तरुणाच्या मामाच्या घरी मुक्कामी होते.


२० मार्च रोजी तरुणीचे नातेवाइक व इतर १० ते १२ जणांनी तरुणाच्या मामाच्या घरी जाऊन तरुणीला मारहाण करत पळवून नेले. यानंतर संशयितांनी तरुणास खांबाला बांधून नग्न करत, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी या तरुणाला दुचाकीने त्यांच्या गावातील घरापर्यंत आणत मारहाण केली. त्याच्या आई-वडिलांनाही घर जाळण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा हात फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

N Chandrasekaran : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर बोलले टाटा सन्सचे अध्यक्ष

नाशिक : नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात टीसीएसच्या सहायक महाव्यवस्थापकासह (एचआर)

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणी ठिकठिकाणी ईडीचे छापे

नाशिक : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याच्यावर अखेर सोमवारी ईडीने छापे टाकले.

NABARD : सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सागरी जिल्ह्यांतील मच्छिमारांना दिलासा

नाबार्डकडून ६१ कोटी २४ लाख; मुलभूत सोयी सुविधांसह जेट्टी आणि बंदरांचा होणार कायापालट मुंबई : सिंधुदुर्ग,

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mukhyamantri Sahayata Nidhi : रुग्णांसाठी मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेत लवकरच होणार 'हे' बदल

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासाठी आता ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार

Pandharpur Acid attack : धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर अॅसिड हल्ला; आरोपी फरार

- राज्यात वाढत्या अत्याचारांमुळे नागरिकांचा संताप राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत