भोंदूबाबा अशोक खरातवर उबाठाची 'कृपादृष्टी'!

शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी वळवले 'कॅप्टन'च्या संस्थेला; ३१ जुलै २०२० रोजी काढला जीआर


मुंबई : नाशिकच्या आध्यात्मिक आणि राजकीय वर्तुळात धुमाकूळ घालणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याच्या पापकर्माचा घडा आता फुटू लागला आहे. या प्रकरणी विरोधक सरकारला लक्ष्य करीत असले, तरी खुद्द उबाठाच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या भोंदूवर मेहरबानी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळवून या बाबाच्या खासगी संस्थानाला बहाल करण्याचा प्रताप मविआ काळात करण्यात आला.


अशोक खरात हा एका रात्रीत मोठे झालेले प्रस्थ नाही. सत्तेच्या ऊबेखाली आणि राजकीय वरदहस्ताने त्याने आपले जाळे विणले होते. 'श्री शिवनिका संस्थान' या आपल्या खासगी संस्थानाला नावारूपाला आणण्यासाठी त्याने तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांशी जवळीक साधली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील या संस्थानासाठी चक्क दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्याचा अजब फतवा दि. ३१ जुलै २०२० रोजी काढण्यात आला होता.


ज्या वेळी राज्य कोरोनाच्या संकटाशी झुंजत होते आणि बळीराजा पाण्याची प्रतीक्षा करत होता, त्याच काळात ठाकरे सरकारने खरातच्या संस्थानासाठी ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्याचा शासन निर्णय (जीआर) काढला. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या दारणा धरणातील पाणी एका भोंदूच्या संस्थानासाठी वळवणे, हा शेतकऱ्यांशी केलेला द्रोह असल्याची संतप्त भावना आता जनमानसात उमटत आहे.


दारणा धरणातून अशोक खरातच्या शिवालीक संस्थेला पाणी सोडण्याचा जीआर आम्ही तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. हा जीआर कोणी काढला, नोटिंगवर कोणाच्या सह्या होत्या याची चौकशी केली जाईल. - राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री
Comments
Add Comment

Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील चांदखेडामध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील २ चिमुकल्या बहिणींचा

Melania Trump On Epstein Files : एकीकडे युद्ध सुरु असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने सोडले 'एपस्टईन फाइल्स' विषयी मौन; म्हणाल्या...

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एपस्टईन फाइल्सविषयी (Epstein Files) अखेर अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने मौन सोडलं

Bombay High Court : ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याकडे एकटक बघणं गुन्हा पण... मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई : कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे निरखून पाहणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आणि अत्यंत

reservation : अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाबाबत पुढील आठवड्यात सुनावणी

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या

Why is Sharad Pawar silent on 'Urban Naxalites' : वारकरी संप्रदायातील 'अर्बन नक्षलवाद्यां'वर शरद पवार गप्प का?

नवनाथ बन यांचा सवाल; लव्ह जिहाद, लांगुलचालनावरून विरोधकांवर टीका मुंबई : "वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची

CM Devendra Fadnavis : छगन भुजबळ हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाची चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाती लँडिंगबाबत