लक्षात ठेवेन, ट्रम्प यांचा नाटो राष्ट्रांना इशारा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींसाठी नाटो सदस्य राष्ट्रांना थेट जबाबदार धरले आहे. ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी'मधील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मदत करण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रांवर ट्रम्प यांनी सडकून टीका केली आहे. ‘हे लोक भित्रे आहेत आणि आम्ही त्यांना नक्कीच लक्षात ठेवू,’ अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला असून, यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


अमेरिकेने इस्राइलसह मिळून इराणविरोधात सुरू केलेले युद्ध २१ दिवस लोटले तरी सुरूच आहे. तसेच इराणकडून होत असलेल्या कडव्या प्रतिकारामुळे अमेरिका आणि इस्राइलला हवे तसे यश मिळताना दिसत नाही आहे. त्यातच इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्याने संपूर्ण जगभरात होणाऱ्या इंधनाच्या वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोमधील देशांची खरडपट्टी काढली आहे. तसेच नाटो देश हे अमेरिकेविना कागदी वाघ आहेत, असा टोला लगावला आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत नाटो राष्ट्रांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, ‘अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय नाटो ही केवळ एक निष्प्रभ संस्था किंवा कागदी वाघ आहे. अण्वस्त्रसज्ज इराणला रोखण्यासाठीच्या लढ्यात सहभागी होण्याची या राष्ट्रांची अजिबात इच्छा नव्हती’. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून नाटो देशांना फटकारले आहे.
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, नाटो देश होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेची मदत करू इच्छित नाहीत. खरेतर ही एक सोपी लढाई होती. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असणे हे जगभरात तेलाच्या किमती वाढण्याचे एकमेव कारण आहे, असेही ट्रम्प यांनी सांगितले. यावेळी नाटो देशांवर संताप व्यक्त करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, खरंतर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचं काम खूप सोपे होते. तसेच त्यामध्ये जोखिमही खूप कमी होती. मात्र नाटो देशांनी दाखवलेला भेकडपणा आम्ही लक्षात ठेवू, असा इशाराही त्यांनी दिला.


जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनीही इराणविरुद्धच्या संघर्षात अमेरिकेला अपेक्षित पाठिंबा दिला नसल्याचे त्यांनी नमूद केले. इराणने आखाती देशांमधील ऊर्जा पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्यांमुळे जागतिक तेल उत्पादनात मोठी घट झाली आहे. ट्रम्प यांच्या मते, हॉर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली ठेवणे ही एक साधी लष्करी मोहीम आहे, परंतु नाटो राष्ट्रे यामध्ये मदत करण्यास नकार देत आहेत. ‘जेव्हा हा लढा लष्करीदृष्ट्या जिंकला गेला आहे, तेव्हा हे देश केवळ तेलाच्या वाढत्या किमतींबद्दल तक्रार करत आहेत, पण जबाबदारी घेण्यास तयार नाहीत’, असे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले.


‘हे युद्ध अमेरिकेचे, नाटोचे नाही’


ट्रम्प यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक युरोपीय राष्ट्रांनी या युद्धात सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ‘हा संघर्ष अमेरिका आणि इराणमधील असून तो नाटोचा भाग नाही, त्यामुळे आम्ही आमचे सैन्य तैनात करणार नाही’, अशी भूमिका या देशांनी घेतली आहे. याउलट, इराणने स्पष्ट केले आहे की, ते केवळ अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांची वाहतूक रोखतील. मित्रराष्ट्रांच्या या 'अलिप्त' धोरणामुळे ट्रम्प कमालीचे संतापले आहेत.

Comments
Add Comment

होर्मुझच्या स्थिरतेसाठी युरोप जपानसह सहा देश एकवटले

तेहरान : होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढता तणाव हाताळण्यासाठी युरोप आणि जपान महत्त्वपूर्ण कारवाई करतील असे

बाथरूममध्ये फुटला टूथब्रश, सगळीकडे धूरच धूर; महिलेने दिली धक्कादायक माहिती

न्यूयॉर्क : मोबाईल, ईव्ही, ई-बाईक यांना आग लागल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. पण ताजी घटना टूथब्रशच्या

Iran-US-Israel War : इराणच्या ताकदीचा अमेरिकन तज्ज्ञांचा अंदाज चुकला; डिएगो गार्सियावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

- इराणच्या टप्प्यात येणार अमेरिका? तज्ज्ञांची मोठी प्रतिक्रिया इराण ने आपल्या सीमांपासून सुमारे ३००० किमी

Iran-US-Israel War : अमेरिका लष्करी कारवाया कमी करणार; मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा दावा

मध्य पूर्वेतील तणावाचा आज २२ वा दिवस आहे. युद्धाचा चौथा आठवडा सुरू होऊनही परिस्थिती अनिर्णित आहे. दोन्ही बाजू सतत

Iran-US-Israel War : आतापर्यंत २,०००हून अधिक मृत्यू, १६५ लहान मुलींचाही बळी

मध्य-पूर्वेतील रणसंग्राम आता केवळ लष्करी तळांपुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट सर्वसामान्य नागरिकांच्या

Iran-US-Israel War : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चक्क बॅकफूटवर; अमेरिकेने इराणी कच्च्या तेलाच्या खरेदीवर दिली ३० दिवसांची सूट

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणच्या तेल खरेदीवरील