बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रेल्वे मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश दिल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या बदलापूरहून नवी मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना ठाणे येथे बदल करून हार्बर मार्गाने प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ आणि गर्दी दोन्ही वाढतात. नव्या प्रकल्पामुळे हा त्रास कमी होणार आहे. या प्रस्तावानुसार बदलापूर आणि वांगणीदरम्यान कासगाव येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याची योजना असून, तेथून नवी मुंबईतील कामोठेपर्यंत नवीन मार्ग विकसित करण्याचा विचार आहे. या प्रस्तावालाही तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे समजते. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक स्तरावरूनही या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. आता रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानंतर या प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या (Simhastha Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिक–नांदुरी रस्त्याच्या (Nashik-Nanduri road) सुरू असलेल्या

Monsoon Health Tips : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? ‘हे’ सोपे उपाय करा; आरोग्य राहील एकदम फिट!

मुंबई : पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, त्वचेचे संसर्ग

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,