एलपीजी पुरवठ्यात २० तर वाटपात ५० टक्के वाढ

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धामुळे देशात निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. २३ मार्चपासून व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा संकटापूर्वीच्या पातळीच्या ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. सरकारचे लक्ष विशेषतः अन्न सेवा क्षेत्र आणि सामुदायिक स्वयंपाकघरांवर केंद्रित असून जनतेला दिलासा देणे आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची खात्री करणे हा त्यामागील उद्देश आहे.


सरकार पीएनजी पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठ्याकडे वळण्यास प्रोत्साहन देत आहे. अनिवार्य नोंदणीची अंमलबजावणी केली जात आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा अतिरिक्त २० टक्के एलपीजी सर्वाधिक गरज असलेल्या क्षेत्रांना प्राधान्याने पुरवला जाईल, ज्यामध्ये रेस्टॉरंट, ढाबे, हॉटेल्स, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया आणि दुग्ध युनिट्स, सरकारी अनुदानित कॅन्टीन, सामुदायिक स्वयंपाकघर आणि स्थलांतरित कामगारांसाठी ५-किलोचे सिलिंडर यांचा समावेश आहे.


केंद्र सरकारने राज्यांना मिळणाऱ्या व्यावसायिक गॅसच्या वाटपात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. राज्यांना आता व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त २० टक्के पुरवठा मिळेल, ज्यामुळे एकूण पुरवठा ५० टक्के होईल. रेस्टॉरंट, हॉटेल, ढाबे आणि उद्योगांना प्राधान्य दिले जाईल. एलपीजी मिळवण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असेल आणि पीएनजीसाठी अर्ज करावा लागेल. मंत्रालयाने सांगितले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार २० राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी गैर-घरगुती एलपीजीच्या पुरवठ्यासाठी आदेश जारी केले आहेत. उर्वरित राज्यांमध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडर पुरवत आहेत. गेल्या आठवड्यात अंदाजे १३,४७९ मेट्रिक टन एलपीजी सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांना प्राधान्य देण्यात आले असून, एकूण व्यावसायिक एलपीजीपैकी अंदाजे ५० टक्के पुरवठा या क्षेत्रांना केला जात आहे.

Comments
Add Comment

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पाकड्यांना पाठवली ईदी, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बिलाल आरिफ सलाफी ठार

मुरीदके : पाकिस्तानला अज्ञातांनी ईदी पाठवली आहे. पाकिस्तानमधील मुरीदके येथील लश्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका

'जैन समाजाची सेवा, त्याग, अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी'

मुंबई : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

मुंबईकरांवर पाणी संकटाची टांगती तलवार

मुंबई : मुंबईला दरदिवशी होणाऱ्या एकूण पाणी पुरवठ्याच्या निम्म्या पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुलातील