साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड

मुंबई : नवी दिल्ली येथे आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहंदळे यांची एकमताने निवड करण्यात आल्याची घोषणा संमेलनाच्या निमंत्रक महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला तसेच स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी केली.


सरहद संस्था, पुणे आणि नवीन महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने हे दोन दिवसीय संमेलन ११ व १२ एप्रिलला होणार आहे. छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंतीचे औचित्य साधून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील १९७४ बॅचच्या लीना मेहेंदळे यांचा जन्म जळगांव जिल्ह्यातील धरणगांव येथे झाला. त्या महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन या पदावरून निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी गोवा राज्याच्या मुख्य माहिती अधिकारी पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. महसूल, प्रशासन, प्रशासकीय कायद्याची अंमलबजावणी, विकास प्रशासन, कार्यालयीन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असे सर्वच महत्वाचे विषय त्यांनी हाताळले आहेत. त्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.


लीना मेहेंदळे यांचे विविध विषयांवर ५०० पेक्षा अधिक लेख आणि २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदी भाषेत अनुवाद केला आहे. त्यांची १९ पुस्तके अनुवादाचीच आहेत. एका मराठी नाटकाचा व एका कादंबरीचाही त्यांनी अनुवाद केला आहे. द लास्ट पास ही इंग्रजी भाषेतील कादंबरी त्यांनी मराठीत अनुवादित केली. लहान मुलांसाठी देखील त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. पक्षीनिरीक्षण, निसर्गोपचार, प्रशासकीय सुधारणा हे त्यांचे आवडते विषय आहेत, संगीचाचीही त्यांना आवड आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : पुढील चार दिवसांसाठी विजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील चार दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला असून,

BMC News : पदपथांवरील सर्व अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवर फिरणार जेसीबी

- कोणतीही अनधिकृत बांधकामे होणार नाहीत अधिकृत - महापालिका आयुक्तांचे सर्व सहायक आयुक्तांना कडक निर्देश मुंबई

BMC News : मुंबईत कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर, कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर,

Kokan Railway : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी ते सावंतवाडी रोड नवी नियमित एक्स्प्रेसला मंजुरी; लवकरच प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

Health Facilities : स्वातंत्र्यदिनी राज्यभरात विक्रमी संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण

मंत्री प्रकाश आबिटकर; ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार मुंबई : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट

Navanath Ban : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नवनाथ बन यांची टीका; भाजपच्या पत्रकार परिषदेत आरोप-प्रत्यारोप

मुंबई : भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार