Iran-US-Israel War : इराणच्या ताकदीचा अमेरिकन तज्ज्ञांचा अंदाज चुकला; डिएगो गार्सियावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

- इराणच्या टप्प्यात येणार अमेरिका? तज्ज्ञांची मोठी प्रतिक्रिया


इराण ने आपल्या सीमांपासून सुमारे ३००० किमी पेक्षा जास्त दूर हिंद महासागरातील डिएगो गार्सिया या महत्त्वाच्या लष्करी ठिकाणावर दोन क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. द वॉल स्ट्रीट जर्नल च्या वृत्तानुसार, या हल्ल्यात अमेरिका आणि ब्रिटन यांच्या लष्करी तळांना कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, या धाडसी कारवाईमुळे दोन्ही महासत्तांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


इराण आपल्या सीमेच्या पलीकडे फार हल्ले करू शकत नाही असा अमेरिकन तज्ज्ञांचा अंदाज इराणने या हल्ल्यातून चुकीचा ठरवला आहे. त्यामुळे अमेरिका आतापर्यंत इराणच्या ताकदीला कमी लेखत असल्याचे स्पष्ट झाले.


डिएगो गार्सिया हे चागोस द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. येथे अमेरिका-ब्रिटनचा एक संयुक्त लष्करी तळ आहे, जो जगातील सर्वात सुरक्षित आणि गुप्त तळांपैकी एक मानला जातो. अमेरिका याला आपल्या जागतिक लष्करी नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग मानते, इतका महत्त्वाचा की त्याला "स्वातंत्र्याचा ठसा" (Footprint of Freedom) म्हटले जाते.


अमेरिका येथून मध्य पूर्व, आफ्रिका आणि आशियामध्ये आपल्या कारवाया सुरू करते. येथे लांब पल्ल्याचे बॉम्बर, पाणबुड्या आणि निगराणी यंत्रणा तैनात आहेत. अमेरिकेसाठी, हे हिंदी महासागरातील एका 'अढळ विमानवाहू जहाजा'सारखे आहे.


डिएगो गार्सिया इराणपासून अंदाजे ३००० किमी पेक्षा जास्त किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर इराणच्या घोषित क्षेपणास्त्र क्षमतेपेक्षा खूप जास्त आहे. इराणने यापूर्वी म्हटले होते की त्यांच्या क्षेपणास्त्रांचा पल्ला २,००० किलोमीटर आहे, पण या हल्ल्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्दल नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. काही संशोधन संस्थांचा दावा आहे की इराणकडे आधीपासूनच ३,०००-४,००० किलोमीटर पल्ल्याची क्षेपणास्त्रे असू शकतात.


इराणचा दावा केवळ एक लष्करी विधान नाही, तर एक सामरिक संदेशही आहे. यातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे की त्यांची क्षेपणास्त्र क्षमता आता अमेरिकेच्या दूरच्या तळांपर्यंत पोहोचू शकते.



इराणची ताकद कमी लेखण्याची चूक?


संरक्षण तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने इराणच्या क्षमतेला कमी लेखण्याची चूक केली आहे. निवृत्त एअर मार्शल अनिल चोपडा यांनी NDTV शी बोलताना सांगितले की, इराण सध्या दोन मोठ्या महासत्तांविरुद्ध उभा ठाकला आहे. सुरुवातीला इराण सहज पराभूत होईल असे वाटत होते, मात्र त्याच्या क्षेपणास्त्र क्षमतेमुळे आता अर्धा युरोप, अरब सागर आणि हिंदी महासागरातील अमेरिकन तळही त्याच्या टप्प्यात आले आहेत.



६,००० क्षेपणास्त्रांचा साठा; फक्त काहींचाच वापर


चोपडा यांच्या मते, इराणकडे सुमारे ६,००० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा असून, त्यापैकी फक्त ६०० ते ७०० क्षेपणास्त्रांचा वापर आतापर्यंत झाला आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अमेरिकेतूनच प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.



इराणच्या धाडसाचे कौतुक : 


निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनीही इराणच्या या कारवाईचे कौतुक केले. त्यांच्या मते, ४,००० किमी दूर असलेल्या अमेरिकन तळावर हल्ला करण्याचे धाडस दाखवणे ही मोठी गोष्ट आहे. अनेक वर्षे निर्बंध झेलल्यानंतरही इराणकडे तंत्रज्ञान आणि कौशल्य असल्याचे यावरून स्पष्ट होते.

Comments
Add Comment

बाथरूममध्ये फुटला टूथब्रश, सगळीकडे धूरच धूर; महिलेने दिली धक्कादायक माहिती

न्यूयॉर्क : मोबाईल, ईव्ही, ई-बाईक यांना आग लागल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. पण ताजी घटना टूथब्रशच्या

Iran-US-Israel War : अमेरिका लष्करी कारवाया कमी करणार; मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा दावा

मध्य पूर्वेतील तणावाचा आज २२ वा दिवस आहे. युद्धाचा चौथा आठवडा सुरू होऊनही परिस्थिती अनिर्णित आहे. दोन्ही बाजू सतत

Iran-US-Israel War : आतापर्यंत २,०००हून अधिक मृत्यू, १६५ लहान मुलींचाही बळी

मध्य-पूर्वेतील रणसंग्राम आता केवळ लष्करी तळांपुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट सर्वसामान्य नागरिकांच्या

Iran-US-Israel War : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चक्क बॅकफूटवर; अमेरिकेने इराणी कच्च्या तेलाच्या खरेदीवर दिली ३० दिवसांची सूट

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणच्या तेल खरेदीवरील

अमेरिकेच्या लढाऊ विमानांना जागा देण्यास श्रीलंकेचा नकार

कोलंबो : मध्य पूर्वेतील युद्धामुळे स्ट्रेट होर्मुझवरील तेल वाहतुकीला फटका बसला आहे. होर्मुझ मार्ग सुरळीत

‘दहशतवादाचा नकाशा बदलला’; जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान जगात अव्वल

- जीटीआय अहवालातून समोर आले धक्कादायक आकडे जागतिक दहशतवादाच्या चित्रात मोठा बदल होत असून पाकिस्तान आता जगातील