बाथरूममध्ये फुटला टूथब्रश, सगळीकडे धूरच धूर; महिलेने दिली धक्कादायक माहिती

न्यूयॉर्क : मोबाईल, ईव्ही, ई-बाईक यांना आग लागल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. पण ताजी घटना टूथब्रशच्या स्फोटाची आहे. एका महिलेने ही माहिती न्यूयॉर्क टाइम्सला दिली आहे. बाथरूममध्ये इलेक्ट्रिक टूथब्रश होता. या टूथब्रशचा स्फोट झाला. सुदैवाने त्यावेळी बाथरूममध्ये कोणीही नव्हते त्यामुळे कोणीही जखमी झालेले नाही. पण बाथरूममध्ये असलेला आरसा तसेच इतर काच सामना फुटून सर्वत्र काचांचा खच झाला.


शार्लोट बोवर्स नावाची ३३ वर्षांची महिला मागील आठ महिन्यांपासून इलेक्ट्रिक टूथब्रश वापरत होती. ती कधीच रात्री झोपताना ब्रश चार्ज करण्यासाठी ठेवत नव्हती. जेव्हा घटना घडली त्यावेळी परिसरातील वीज प्रवाह खंडीत झालेला होता. वीज प्रवाह पुन्हा सुरू झाला आणि थोड्याच वेळात बाथरूममधून स्फोटासारखा आवाज आला. बाथरूममधील बेसिनवर ठेवलेला इलेक्ट्रिक टूथब्रश जळून खाक झाला होता. स्फोटामुळे बाथरूममध्ये काचांचा खच पडला होता.


स्फोटामुळे बाथरूमचे प्रचंड नुकसान झाले. शार्लोट आणि तिचे पती बेडरूममध्ये होते. स्फोटात त्यांना काहीही झाले नाही. पण स्फोटानंतर त्यांना बाथरूम दुरुस्त करण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागला. या प्रकरणी टूथब्रश कंपनीला शार्लोट बोवर्सने माहिती दिली. माहिती मिळताच कंपनीने जास्त चौकशी न करता शार्लोटला ४६ डॉलरची भरपाई देण्याची तयारी दाखवली आहे. पण बाथरूमच्या दुरुस्ती झालेला खर्च विचारात घेता कंपनीने भरपाईची रक्कम वाढवावी, अशी मागणी शार्लोट बोवर्स करत आहे.


Comments
Add Comment

External Affairs Minister : अमेरिकेची दुटप्पी धोरणे आणि भारताचे ऊर्जा धोरण; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट मांडली भूमिका

NEW DELHI : रशियाकडून केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवरून पाश्चात्य देशांकडून होणाऱ्या टीकेला परराष्ट्र

Iran-US War Update : इराण-अमेरिका संघर्ष संपणार? ट्रम्प यांनी दिली होर्मुज सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट

अमेरिका : अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे (Conflict) जगभरात

Three Indian sailors killed : ओमाननजीक अमेरिकेने मालवाहू जहाजावर केलेल्या भीषण हल्ल्यात तीन भारतीय नाविकांचा मृत्यू

भारताकडून अमेरिकेच्या राजदूतांना समन्स नवी दिल्ली :  ओमानच्या खाडीत एका व्यावसायिक मालवाहू जहाजावर अमेरिकेने

Iran - America War : ट्रम्प यांची इराणला थेट युद्धाची धमकी! ‘आज रात्री मोठा हल्ला करू’; तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळवण्याचाही दावा

पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता धोकादायक वळण

Canada New Bill : सोशल मीडियावर कॅनडाचा अंकुश; १६ वर्षांखालील मुलांसाठी नवीन विधेयक सादर

CANADA : डिजिटल युगात मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, कॅनडा सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. १६

Iran-US War News : ओमान किनाऱ्याजवळ तेलवाहू जहाजावर भीषण हल्ला; जहाजावर होते भारतीय कर्मचारी

ओमान : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या समुद्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओमानच्या