Iran-US-Israel War : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चक्क बॅकफूटवर; अमेरिकेने इराणी कच्च्या तेलाच्या खरेदीवर दिली ३० दिवसांची सूट

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणच्या तेल खरेदीवरील निर्बंधांमध्ये ३० दिवसांची तात्पुरती सूट जाहीर केली आहे. ही सूट फक्त समुद्रात आधीपासून असलेल्या इराणी तेलवाहू टँकरमधील तेलाच्या खरेदीसाठी लागू राहणार आहे. यामागचा उद्देश जागतिक ऊर्जा पुरवठा वाढवणे आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवणे हा आहे.


इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेचे ट्रेझरी मंत्री स्कॉट बेसेंट यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. ट्रेझरी विभागाच्या संकेतस्थळानुसार, ही सूट २० मार्च ते १९ एप्रिल या कालावधीसाठी लागू असेल.


जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवून दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल ११० डॉलरच्या पुढे गेले आहेत. विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारी रोजी संघर्ष सुरू होण्यापूर्वी हे दर सुमारे ७० डॉलर प्रति बॅरल होते. स्कॉट बेसेंट यांनी दिलेल्या निवेदनानुसार, या निर्णयामुळे जागतिक बाजारात अंदाजे १४ कोटी बॅरल कच्चे तेल लवकर उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ऊर्जा उपलब्धता वाढेल आणि सध्या निर्माण झालेला पुरवठ्यावरील ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना