IPL 2026 : आयपीएल २०२६ ला दुखापतींचं ग्रहण; अनेक क्रिकेटपटूंच्या दुखापतींमुळे फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असतानाच, अनेक संघ दुखापतींशी झुंजत आहेत. १० पैकी आठ फ्रँचायझींना याचा फटका बसला आहे. दुखापतग्रस्त झालेले जवळपास सर्व क्रिकेटपटू गोलंदाज आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांना दुखापतींचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.


आयपीएल २०२६ च्या संघांबाबत आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, १५ क्रिकेटपटू विविध प्रकारच्या दुखापतींनी त्रस्त आहेत. काही क्रिकेटपटू संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर आहेत, तर काही सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत. काहींच्या दुखापतींविषयी अधिकृत माहिती अद्याप अपेक्षित आहे. पण या हंगामात त्यांचा सहभाग संशयास्पद मानला जात आहे.


जाणून घ्या की सध्या कोणते क्रिकेटपटू जखमी आहेत आणि ते किती आयपीएल सामने खेळू शकणार नाहीत.



हर्षित राणा (कोलकाता नाईट रायडर्स)


हर्षितच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. हर्षित राणा संपूर्ण आयपीएल हंगामासाठी संघाबाहेर असेल. केकेआर त्याच्या जागी बदली क्रिकेटपटूच्या शोधात आहे.



पॅट कमिन्स (सनरायझर्स हैदराबाद)


पाठीच्या दुखापतीमुळे हा अनुभवी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सुरुवातीच्या सामन्यांसाठी संघाबाहेर असेल. परिणामी, फ्रँचायझीने इशान किशनला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.



जोश हेझलवूड (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) 


हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. तो हॅमस्ट्रिंग आणि घोट्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे, तो आरसीबीच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. तो संघात कधी परत येईल हे अद्याप कळलेले नाही.



मिचेल स्टार्क (दिल्ली कॅपिटल्स)


हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज दुखापतमुक्त आहे. पण कामाच्या ताणाचे व्यवस्थापन (वर्कलोड मॅनेजमेंट) करावे लागत असल्याने, तो दिल्लीच्या सलामीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.



नॅथन एलिस (चेन्नई सुपर किंग्स)


हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. तो संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर आहे.



सॅम करन (राजस्थान रॉयल्स)


हा इंग्लिश अष्टपैलू क्रिकेटपटू मांडीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२६ मधून बाहेर मानला जात आहे. तो ट्रेडद्वारे चेन्नईकडून राजस्थान संघात सामील झाला होता.



अथर्व अंकोलेकर (मुंबई इंडियन्स)


मुंबईचा हा युवा गोलंदाज गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. तो संपूर्ण हंगामासाठी मुंबई इंडियन्सकडून उपलब्ध नसेल.



जॅक एडवर्ड्स (सनरायझर्स हैदराबाद)


हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू देखील आयपीएल २०२६ ला मुकणार आहे. लीगमध्ये खेळण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. पण पायाच्या दुखापतीमुळे जॅक एडवर्ड्स संघाबाहेर गेला आहे.



ऍडम मिल्ने (राजस्थान रॉयल्स)


हा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त आहे. यामुळे तो आयपीएल २०२६ ला मुकू शकतो.



मथिशा पाथिराना (कोलकाता नाईट रायडर्स)


पोटरीच्या स्नायूला ताण आल्यामुळे हा श्रीलंकन वेगवान गोलंदाज संघाबाहेर आहे. टी-२० विश्वचषकादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. तो पूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता.



वानिंदू हसरंगा (लखनऊ सुपर जायंट्स)


हा श्रीलंकन लेग-स्पिनर देखील जखमी आहे. टी-२० विश्वचषकादरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. परिणामी, तो सुरुवातीचे सामने मुकू शकतो.



लॉकी फर्ग्युसन (पंजाब किंग्स)


न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजाने कौटुंबिक कारणांमुळे आयपीएल २०२६ चे सुरुवातीचे सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.



मॅथ्यू शॉर्ट (चेन्नई सुपर किंग्स)


ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलू क्रिकेटपटूच्या अंगठ्यावा दुखापत झालीआहे. तो अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. शॉर्ट सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर राहू शकतो.



इशान मलिंगा (सनरायझर्स हैदराबाद)


श्रीलंकेचा हा वेगवान गोलंदाज खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. याच कारणामुळे तो टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला होता. आयपीएल २०२६ मधील त्याचा सहभाग अनिश्चित आहे.



मयंक यादव (लखनौ सुपर जायंट्स)


हा युवा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे मागील हंगाम खेळू शकला नाही. तो नुकताच तंदुरुस्त होऊन परतला आहे, पण त्याच्या बरगड्यांमध्ये ताण आल्याची तक्रार तो करत असल्याची माहिती आहे.



मोहसिन खान (लखनौ सुपर जायंट्स)


उत्तर प्रदेशच्या या वेगवान गोलंदाजाला गुडघ्याचा त्रास आहे, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.

Comments
Add Comment

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच

खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील