राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचा रुपाली चाकणकरांना आदेश

मुंबई : बलात्कार, महिलांचे लैंगिक शोषण, महिलांची फसवणूक अशा गंभीर आरोपांमध्ये भोंदू बाबा आणि स्वयंघोषीत कॅप्टन अशोक खरात याला अटक झाली आहे. अशोक खरातसोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. अशोक खरातचे पाय धुतानाचे तसेच त्याच्या सोबत कार्यक्रमस्थळी वावरत असतानाचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हायरल होत असताना चाकणकरांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे.


पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. तर पोलीस कारवाई निःपक्षपाती व्हावी यासाठी रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.



राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपात अटक करण्यात आली आहे. स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या भोंदू अशोक खरातचे एकूण ५८ धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. महिलांना प्रसाद म्हणून गुंगी येणारे औषध खाऊ घालून नंतर त्यांच्यावर अत्याचार केल्याचे खरातचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशोक खरात स्वतःच्या कार्यालयातच धक्कादायक वर्तन करत होता. हा भयंकर प्रकार सुरू असताना खरातच्या नकळत त्याच्या ऑफिस बॉयने अर्थात नीरज जाधवने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने ५८ व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. दुष्कृत्य करूनही खरात समाजात 'साधू' म्हणून वावरत असल्याचे पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. नीरज जाधवने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी या वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. खरातने पैसे देण्यास नकार दिला. यानंतर नीरज अनपेक्षित अशी कृती केली. भोंदू बाबा खरातने ज्या महिलांचे शोषण केले त्यातल्याच एका महिलेला फोटो आणि व्हिडीओ पाठवून पैसे मागितले. या महिलेला जवळच्या नातलगांनी पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला आणि संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले. पोलिसांनी अशोक खरातला बलात्काराच्या आरोपात तर नीरजला खंडणीच्या आरोपात अटक केले.


तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याची कोट्यवधींची संपत्ती आहे. या संपत्तीची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली असून चौकशी सुरू आहे. एका ज्योतिषाकडे एवढी अफाट संपत्ती असल्याचे बघून पोलीसचही चकीत झाले आहेत. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात खरातने अफाट माया उभी केली आहे. या पैशांचे स्रोत शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

China AI Robot Wolf Army : भविष्यात AI कुत्रे करणार ड्रोनचा सामना; भविष्यातील युद्धासाठी चीनची ‘रोबोट वुल्फ आर्मी’ सज्ज!

चीन वेगाने आधुनिक आणि मानवविरहित युद्धाच्या दिशेने पुढे जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात उघड झाले आहे

Iran-US-Israel War : युद्ध संपलेले नाही,गरज पडल्यास युद्धात परतण्यास इस्त्रायल सज्ज - बेंजामिन नेतन्याहू

अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Shivendrasinhraje Bhonsle : मंत्रालयातील नवीन इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला सविस्तर आढावा

मंत्रालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री

Saudi and Iran : शस्त्रसंधीनंतर सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

इराण, इस्रायल आणि अमेरिका (Iran-US-Israel War) यांच्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्णायक शांतता चर्चेपूर्वीच सौदी अरेबिया