खरातच्या 'पाद्यपूजे'चे व्हिडीओ Viral, चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश

मुंबई : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याच्या अघोरी कृत्यांचे आणि लैंगिक शोषणाचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या घटनात्मक पदावर असताना एका अत्याचार प्रकरणातील संशयित व्यक्तीशी इतके घनिष्ठ संबंध असणे नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याने मुख्यमंत्र्यांनी ही कठोर भूमिका घेतल्याचे समजते.



भोंदूबाबा अशोक खरात विरोधातील तक्रारींनंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून पोलिसांना सखोल तपासाचे निर्देश दिले होते. पुराव्यांची खातरजमा झाल्यानंतरच पोलीस महासंचालकांच्या आदेशाने खरातवर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी खरातच्या ताब्यातून काही महत्त्वाच्या चित्रफिती आणि माहिती आधीच जप्त केली होती. त्यामुळे तपासाला गती मिळाली. दरम्यान, मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेला अशोक खरात सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ‘श्री शिवानिका संस्थान’ नामक ट्रस्ट चालवत होता. या संस्थेच्या कार्यकारी मंडळात रुपाली चाकणकर यांचा समावेश असल्याचे समोर आले. चाकणकर या खरातच्या मागे छत्री धरून उभ्या असतानाचे फोटो आणि त्याची 'पाद्यपूजा' करतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत. याशिवाय, त्यांनी खरातचा ‘पितृतुल्य गुरूमाऊली’ असा उल्लेख केल्याचेही समोर आले आहे.


दरम्यान, अशोक खरातच्या कार्यालयातून पोलिसांनी ५८ आक्षेपार्ह चित्रफिती जप्त केल्या आहेत. यामध्ये राजकीय क्षेत्रातील मंडळींसह विविध क्षेत्रांतील नामांकित महिलांची माहिती असल्याने पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. या प्रकरणाची वाढती व्याप्ती आणि आंतरराज्य लागेबांधे पाहता, राज्य सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली 'विशेष तपास पथक' (एसआयटी) स्थापन केले आहे.



अनेक बड्या नेत्यांशी संबंध


अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगणाऱ्या खरातकडे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील अनेक उच्चपदस्थांची ये-जा होती. २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर यांनीही या मंदिरात भेट दिली होती. मात्र, चाकणकर या थेट संस्थेच्या विश्वस्त असल्याने त्यांना हे प्रकरण भोवले आहे. खरातवर अत्याचार, खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी नाशिक, वावी आणि शिर्डी पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्याला २४ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.


चाकणकर यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट


रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. "मी माझी भूमिका लवकरच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करेन," असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आपण सध्या भेट घेणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार