गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते. प्रमोद सावंत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गुरुवारी (१९ मार्च) दुपारी अचानक छातीत त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.



नेमकं काय घडलं?


मुख्यमंत्री सावंत हे गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुलीला भेटण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांना गुरुवारी दुपारी छातीत दुखू लागल्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांची अँजिओग्राफी केली असता, हृदयात एक 'ब्लॉक' आढळला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि ती यशस्वीरित्या पार पाडली.


विशेष म्हणजे, १९ मार्च हा दिवस डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. २०१९ मध्ये याच दिवशी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. गुरुवारी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला ७ वर्षे पूर्ण झाली. या वर्धापनदिनाच्या दिवशीच त्यांच्यावर शस्त्रक्रियेची वेळ आल्याने समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण, आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डिस्चार्ज देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Comments
Add Comment

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान