बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी एडीबी सहकार्य करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे (एडीबी) सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने पणन मंत्री जयकुमार रावल यांचा मनीला दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयात आयोजित ‘आशिया आणि पॅसिफिक अन्न प्रणाली मंच २०२६’ मध्ये सहभागी होत मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, मुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजार (एमआयएएम) आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) बळकटीकरणावर लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक व मॅग्नेट प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे यावेळी उपस्थित होते.





या दौऱ्यात पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आशियाई विकास बँकेचे उपाध्यक्ष (दक्षिण, मध्य व पश्चिम आशिया विभाग) यिंगमिंग यांग यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील 'मॅग्नेट' प्रकल्प, मुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजार (एमआयएएम) तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे (एपीएमसी) आधुनिकीकरण व बळकटीकरण यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या चर्चेत कृषी मूल्य साखळी अधिक बळकट, सर्वसमावेशक आणि शाश्वत करण्यावर विशेष भर देण्यात आला.


आशियाई विकास बँकेचे महासंचालक विनफ्रेड विकलेन आणि सीनियर सेक्टर डायरेक्टर कविंगफेंग झांग यांच्यासोबतही मंत्री जयकुमार रावल यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील कृषी पायाभूत सुविधा, काढणीपश्चात व्यवस्थापन (पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट) आणि कृषी-लॉजिस्टिक्स क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. या दौऱ्यामुळे राज्यातील कृषी बाजार व्यवस्थेला आधुनिक, कार्यक्षम आणि शाश्वत बनविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्याला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

Comments
Add Comment

Transport Minister Pratap Sarnaik's announcement : ठाणेकरांची हक्काची मेट्रो तीन महिन्यांत रुळावर

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घोडबंदर रोडचे पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण मुंबई

Devendra Fadanvis : इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव मुंबई : ज्या

Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीला यश, बंजारा टायगर आंदोलन मागे; मागण्यांवर सकारात्मक भूमिका

मुंबई : बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू

Mumbai Metropolitan Region : मुंबई महानगर प्रदेशसह विविध जिल्ह्यांना वीजपुरवठा अधिक सक्षम

महापारेषणची बाभळेश्वर–कुडूस ४०० के.व्ही. वीजवाहिनी कार्यान्वित मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण

Eknath Shinde Opretion Tiger : 'उबाठा'च्या खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक?

'ऑपरेशन टायगर'ला पुन्हा वेग; ९ पैकी ८ खासदार हजर असल्याची चर्चा मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'उबाठा'

Bmc News : येत्या मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणीकपात

किमान १० टक्के होणार पाणी पुरवठ्यात कपात