संजनाच्या पोस्टमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का, लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात सूरज चव्हाणच्या घरी गुड न्यूज?

मुंबई: बिग बॉस मराठीचा पाचव्या पर्वाचा विजेता ठरलेला सूरज चव्हाण कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. सुरजच्या प्रत्येक गोष्टींची प्रेक्षकांना उत्सुकता असते. अलीकडेच त्याच्या लग्नामुळे तो प्रसिद्धीझोतात आला होता. त्याच्या लग्नाची ,लग्नातील प्रत्येक विधीची एकच चर्चा झाली. लग्नानंतर तीन महिन्यांमध्येच आता सुरज बाबा होणार असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत. याला कारणही आहे ते सुरजच्या बायकोने शेअर केलेल्या एका पोस्टचं. संजनाने पोस्ट केलेल्या या फोटोच्या मागे लावलेल्या ऑडिओ क्लिपमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजनाच्या पोस्टखाली अनेकांनी तिचं अभिनंदन केलंय. अनेकांनी संजनाचा बेबी बम्प दिसतोय असं म्हटलंय.



संजनाची पोस्ट व्हायरल


सुरज चव्हाणची बायको संजनाने अलीकडेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास फोटोशूट केलेलं. या फोटोशूट मधील एक फोटो तिने पोस्ट केला आहे. त्यामागे एक ऑडिओ वाजतोय. त्यात " अजून तू माझ्या पोटात आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते. तू हललास की वाटतं आयुष्य हलकं झालं. आता फक्त तुझी वाट बघते. तुझ्या त्या पहिल्या श्वासासाठी, आणि त्या छोट्याशा हसण्यासाठी. माझं संपूर्ण जग तुझ्यात बसलेलं आहे. ' असा आवाज लावण्यात आलेला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी तिला अभिनंदन अशा कमेंट्स केल्या आहेत. लग्नानंतर तीन महिन्यातच सुरज चव्हाण बाबा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. शिवाय राजश्री मराठीच्या सोशल मीडिया पेजवरूनही या संदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे त्यामुळे चर्चांना आणखी दुजोरा मिळाल्याचे दिसतय. मात्र सुरज चव्हाण आणि संजना चव्हाण यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आता ही केवळ अफवा आहे की खरंच सुरज चव्हाणच्या घरी गुड न्यूज आहे, हे त्याने अधिकृत स्पष्ट केल्यानंतरच कळेल.





दरम्यान काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर सुरज चव्हाणने त्याचं नवं घर बांधलं. त्याच्या घरासाठी त्याला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी मदत केली होती. नंतर त्याचा झापून हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. नंतर त्याच्या मामाची मुलगी असलेल्या संजनासोबत त्याने लग्न गाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो व्हिडिओ लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतले होते.

Comments
Add Comment

AA22xA6 Is Now Raaka : 'राका' नावासह AA22xA6 चा पोस्टर रिलीज, अल्लू अर्जूनच्या लूकनं घातला धुमाकूळ

मुंबई : सिनेविश्वातील सर्वात मोठा सुपरस्टार अल्लू अर्जून ( Allu Arjun) त्याच्या नवा अ‍ॅक्शन सिनेमासह धमाल करण्यासाठी

Prasad Oak : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रसाद ओकच्या नव्या लूकची चर्चा, लवकरच झळकणार 'या' भूमिकेत

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सध्याच्या

Purnimecha Phera : रहस्यमय 'पौर्णिमेचा फेरा सिझन ३’ वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर धूमाकूळ

मुंबई : मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi Ticket To Finale: अखेर 'ही' सदस्य ठरली पहिली फायनलिस्ट, 'तिकीट टू फिनाले'च्या टास्कमध्ये मारली बाजी

मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७