भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या पापाचा घडा आता भरला आहे. नाशिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अफाट संपत्तीचे एकामागून एक धक्कादायक तपशील समोर येत आहेत. विशेष म्हणजे, शिर्डीतील अत्यंत 'प्राईम लोकेशन'ला खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींचा भूखंड असल्याचे उघड झाले असून या मालमत्तेची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे.


बुधवारी रात्री नाशिक गुन्हे शाखेने खरातला बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे बुधवारी दुपारीच शिर्डीतील त्याच्या मालकीच्या भूखंडावर असलेली गव्हाची काढणी अत्यंत घाईघाईने उरकण्यात आली. शेतातील गहू कापून तो तातडीने तेथून हलवण्यात आला. पोलिसांची कारवाई होणार याची कुणकुण खरातला आधीच लागली होती का? आणि अटकेपूर्वी मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा किंवा तिथून काही संशयास्पद वस्तू हलवण्याचा हा प्रयत्न होता का? या दृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत.



कुठं कुठं खरातची संपत्ती?



केवळ नाशिकच नव्हे, तर सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव या परिसरात खरातने मोठी मालमत्ता जमवल्याची चर्चा आहे. शिर्डीतील ज्या भूखंडावर हा प्रकार घडला, तो जमिनीचा तुकडा अतिशय महागड्या ठिकाणी आहे. एका सामान्य ज्योतिषाकडे एवढी प्रचंड संपत्ती आली कुठून? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महिलांच्या शोषणातून आणि फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून ही संपत्ती जमवली गेली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.



खरातचे पाय अधिकच खोलात



अशोक खरातच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे. त्याच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ आणि आता समोर आलेली ही बेनामी संपत्ती, यामुळे खरातचे पाय अधिकच खोलात गेले आहेत. नाशिक गुन्हे शाखा आता त्याच्या सर्व बँक खात्यांची आणि मालमत्तेच्या कागदपत्रांची पडताळणी करणार आहे.


बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला नाशिक क्राइम ब्रांचने अटक केली आहे. संबंधित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५८ व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून, त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक क्राइम ब्रांच करत आहे.


Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस