धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे आमिष, बळजबरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार!

मुंबई : राज्यातील १४ कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने 'धर्मस्वातंत्र्य विधेयक' मंजूर केले आहे. आमिष किंवा दबाव टाकून धर्मांतर करणाऱ्या संस्थांचे कंबरडे आता या कायद्यामुळे मोडले जाईल.," असे सांगून या कायद्याचे समर्थन करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले.


बावनकुळे म्हणाले की, "देशातील १२ राज्यांनी यापूर्वीच हा कायदा केला असून आता महाराष्ट्रही त्यात सामील झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा करताना अतिशय काळजीपूर्वक मांडणी केली आहे. तथापि, या विषयावरून आमदार जितेंद्र आव्हाडांचे मानसिक संतुलन बिघडले. ते केवळ आपल्या मतदारसंघातील ७० टक्के विशिष्ट मतदारांना खूश करण्यासाठी गलिच्छ राजकारण करत आहेत.


* समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात : महायुतीची समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात होईल आणि मित्रपक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तिथे सविस्तर चर्चा केली जाईल.


* तक्रार जशी आली, तशी पुढे ! : आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधातील तक्रारीबाबत बावनकुळे म्हणाले, मंत्री म्हणून माझ्याकडे कुणीही तक्रार केली, तर तिची चौकशी करण्याचे आदेश देणे हे माझे कर्तव्य आहे. मंत्रालयातील कामकाजाच्या पद्धतीनुसार, तक्रार अर्ज जसा येतो तसाच तो चौकशीसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठवला जातो. यात कोणताही वैयक्तिक हस्तक्षेप नाही. नरेंद्र मेहता यांनी काहीही चुकीचे केलेले नाही"


* ओरिसात मोदींच्या विकासापुढे काँग्रेस हतबल : ओडिशा राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून विजयानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओरिसामध्ये जी विकासकामे केली आहेत, त्या कामांच्या जोरावर तेथील काँग्रेसचे आमदारही आता आपल्याच पक्षाला मतदान करायला तयार नाहीत. 'तुम्ही आता विकास करू शकत नाही, केवळ भाजपच विकास करू शकतो' असे ठणकावून सांगत काँग्रेसच्या आमदारांनी सर्वांसमक्ष भाजपला मतदान केले आहे. ओरिसाचे राजकारण बदलण्याच्या दृष्टीने हा मोठा प्रयत्न असून मोदींच्या विकासाची ही लाट आता देशव्यापी झाली आहे."

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश  २०० कोटींच्या दंड

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Nashik MNC Forced Conversion Case : नाशिकमध्ये नामांकित कंपनीत तरुणींचा धर्मांतरासाठी छळ; नमाज आणि बीफ खाण्याचा दबाव

नाशिक : मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :

Eknath Shinde : निवडणुका संपल्या आता पक्ष वाढीवर भर द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांना निर्देश

मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्याचा सूचना लोकप्रतिनिधींनीही कार्यकर्ता म्हणून पक्ष संघटनेत योगदान