कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री नुकसानभरपाई जाहीर करणार

मुंबई : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकणातील मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आंबा व काजू पिकांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान, हवामानातील बदल आणि शेतकऱ्यांची अडचण यावर सविस्तर चर्चा झाली.





आंबा व काजू पिकांचे तब्बल ९० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर झाला असून, कोकणातील शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेले मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी या गंभीर परिस्थितीचा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून सखोल आढावा घेत, अधिवेशन संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा देणारी मदत जाहीर केली जाईल असे आश्वासन दिले.


या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण  राणे, खासदार सुनील तटकरे, कृषी मंत्री दत्ता भरणे , उद्योग मंत्री उदय सामंत , महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले , गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, आ. दीपक केसरकर, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. भास्कर जाधव, आ. महेंद्र दळवी, आ. राजेंद्र गावित, आ. किरण सामंत आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम