ॲमेझॉन एअर ने आता ५ पट वेगाने डिलिव्हरी होणार

नवी दिल्ली : ॲमेझॉन एअरची ईशान्य भारतात सेवा विस्तारत असल्याची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत नवीन कार्गो मार्ग हे कोलकाता आणि गुवाहटी दरम्यान सुरु करण्यात येत असून यामुळे आता या भागातील वाहतूक सुविधा आणि जोडणी अधिक सक्षम होणार आहे. त्याच बरोबर विशेष अशा हवाई क्षमते मुळे डिलिव्हरी करण्याचा वेग आणि विश्वसनीयता वाढू शकेल, ज्यामुळे ईशान्य भारतातील ॲमेझॉनची मोठ्या प्रमाणावरील उत्पादने संपूर्ण भारतातील ग्राहकांपर्यंत वेगाने आणि अधिक सातत्याने प्राप्त होऊ शकतील.


या सेवेमुळे सेव्हन सिस्टर्स राज्ये म्हणजेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांना एकात्मिक अशा हवाई आणि रस्ते वाहतूकीच्या नेटवर्कने जोडून या राज्यांतील डिलिव्हरीजना सहकार्य प्राप्त होईल. विशेष अशा हवाई क्षमतेला मल्टीमोडल वाहतूक सुविधांशी जोडल्यामुळे ॲमेझॉनला वाहतूकीचा वेळ कमी होण्याची अपेक्षा असून यामुळे पाच पट पर्यंत डिलिव्हरीचा वेळ कमी होणार आहे, यामुळे वैविध्यपूर्ण उत्पादने अगदी रोजच्या गरजांपासून ते स्मार्टफोन पर्यंत, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि ब्यूटी उत्पादनांसह अनेक उत्पादने ग्राहकांपर्यंत वेगाने उपलब्ध होऊ शकतील.


गुवाहटीकडे जाणार्‍या पहिल्या ॲमेझॉन एअर फ्लाईटला नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारत सरकारचे नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू किंजरप्पू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी त्यांच्या सह, ॲमेझॉनच्या इंडिया अँड ऑस्ट्रेलियाच्या ऑपरेशन्सचे व्हाईस प्रेसिडेंट अभिनव सिंग, ॲमेझॉन इंडियाच्या पब्लिक पॉलिसीचे व्हीपी चेतन कुमारस्वामी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


ईशान्य भारतात २०१४ मध्ये ४ विमानतळ होते जे आता वाढून १६ झाले आहेत. यामुळे ईशान्य भारतातील राज्यांना निर्यातीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या निमित्ताने ईशान्येतील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे.


अॅमेझॉन. इन कंपनीने २०१३ पासून भारतात सेवा देण्यास सुरुवात केली आहे. अॅमेझॉन एअर ही कंपनी देशभर मालवाहतूक सेवा देत आहे. कंपनीने आता ईशान्य भारतात विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. याचा ईशान्येतील राज्यांमध्ये कार्यरत व्यावसायिकांना भरपूर फायदा होईल, असा विश्वास ॲमेझॉनच्या इंडिया अँड ऑस्ट्रेलिया ऑपरेशन्सचे व्हीपी अभिनव सिंग यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी

‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला.

Health Tips : ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास 'या' गोष्टींकडे अजिबात नका करू दुर्लक्ष, अशी घ्या आरोग्याची काळजी

जर तुम्हाला हाई ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे योग्य वेळी

Television Actress : टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या 'या' अभिनेत्री घेतात बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त मानधन; कमाई ऐकून व्हाल थक्क

अनेकदा आपल्या असं वाटतं की बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकतात त्यामुळे त्यांची कमाई फार जास्त असते.

अभिनेत्री दिपिका कक्कड भावूक, आरोग्याविषयी व्यक्त केली चिंता

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड हिला २०२५ मध्ये आपल्याला कॅन्सर असल्याचे समजले. नुकताच यासंबधित

Salman khan : बॉलीवूडच्या भाईजाननं अचानक बदललं आपल्या आगामी चित्रपटाचं नाव; सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत दिला 'हा' सामाजिक संदेश

बॉलीवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमानने आपल्या आगामी चित्रपटाचं नाव बदलण्याची घोषणा केली आहे. नुकताच एक सोशल