कोकणचा राजा दाखल! एपीएमसीत ६ हजार पेट्यांची विक्रमी आवक; पण 'हापूस' अद्याप महागच

नवी मुंबई : आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! कोकणच्या लाल मातीतील अस्सल हापूस आंब्याची नवी मुंबईतील एग्रीकल्चर प्रोड्युस मार्केट कमिटी (APMC) बाजारपेठेत मोठी एन्ट्री झाली आहे. सोमवारी बाजारपेठेत तब्बल ६,००० पेट्यांची आवक झाली असून, चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक मानली जात आहे. यंदा कोकणात वातावरणात वारंवार होणारे बदल, अनपेक्षित धुके आणि तापमानातील चढ-उतार यामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात आंबा खराब झाला असून, कोकणातील बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आवक वाढली असली तरी दर्जेदार आंब्याचे प्रमाण मर्यादित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.





खिशाला बसणार 'चटका'


बाजारात आवक वाढल्याने दर कमी होतील अशी अपेक्षा खवय्यांना होती, मात्र सध्या तरी दर चढेच आहेत. सद्यस्थितीत बाजारपेठेत एका पेटीचा दर ४,००० ते ९,००० रुपयांच्या घरात आहे. पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता असली, तरी उत्पादनातील घट पाहता दरात मोठी घसरण होण्याची शक्यता कमीच असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोकणातील शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आहे. त्यामुळे आंबा खवय्यांनी दराची फारशी तमा न बाळगता, थोडीशी खिशाला कात्री लावून आंबा खरेदी करावा आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला साथ द्यावी, असे आवाहन एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Baramati Assembly by-election : बारामती पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी

- निवडणूक बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे इतर सर्व पक्षांना आवाहन ठाणे : बारामती विधानसभा

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर