इंस्टाग्रामची मोठी अपडेट; डीएम्सच फिचर होणार बंद?

कॅलिफोर्निया : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वापरणाऱ्या यूजर्ससाठी एक महत्त्वाचा बदल समोर आला आहे. इंस्टाग्रामचे मालक असलेल्या मेटा कंपनीने डायरेक्ट मेसेजेसमधील एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हे फीचर ८ मे २०२६ नंतर इंस्टाग्रामवर उपलब्ध राहणार नाही.


कंपनीने आपल्या सपोर्ट पेजवरील अपडेटमध्ये ही माहिती दिली आहे. मेटाच्या म्हणण्यानुसार, इंस्टाग्रामवरील एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन फीचरचा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या अत्यल्प होती. त्यामुळे हे फीचर काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


इंस्टाग्रामवर हे फीचर व्हॉट्सॲपप्रमाणे डिफॉल्ट स्वरूपात सुरू नव्हते. ते काही विशिष्ट भागांमध्ये उपलब्ध होते आणि प्रत्येक चॅटसाठी यूजर्सना ते मॅन्युअली सुरू करावे लागत होते. त्यामुळे अनेक यूजर्स या पर्यायाचा वापर करत नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.


मेटाकडून सांगण्यात आले आहे की , फारच कमी यूजर्स इंस्टाग्राम डीएममध्ये एन्क्रिप्टेड मेसेजिंगचा वापर करत होते. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत हा पर्याय हटवला जाईल. एन्क्रिप्टेड मेसेजिंगचा वापर सुरू ठेवायचा असल्यास यूजर्स व्हॉट्सॲपसारख्या प्लॅटफॉर्मचा पर्याय निवडू शकतात,


दरम्यान, मेसेंजर प्लॅटफॉर्ममध्ये कोणते बदल केले जाणार आहेत याबाबत कंपनीने अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. २०२३ पासून मेसेंजरमध्ये डिफॉल्ट एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि या सुरक्षाविषयक प्रणालीला अधिक मजबूत करण्याचे काम सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे.


मेटाने सर्वप्रथम २०१६ मध्ये व्हॉट्सॲपवर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन लागू केले होते. त्यानंतर कंपनीने आपल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर प्रायव्हसीला प्राधान्य देणारी धोरणे राबवण्याची घोषणा केली होती. मात्र एन्क्रिप्शनसारख्या तंत्रज्ञानावर दीर्घकाळ वाद सुरू असून काही सरकार आणि बालसुरक्षा संस्था याबाबत चिंता व्यक्त करत आल्या आहेत. यामुळे इंस्टाग्रामवरील एन्क्रिप्शन फीचर बंद करण्याच्या निर्णयाकडे तंत्रज्ञान क्षेत्रात आणि यूजर्समध्येही लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

West Asia War : पश्चिम आशियातले युद्ध सुरूच राहणार ? शस्त्रसंधीची शक्यता मावळली ?

इस्लामाबाद : इस्रायल,अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध २८ एप्रिल २०२६ रोजी पश्चिम आशियात सुरू झाले. या

attack on Lebanon : ट्रम्पच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच

जेरुसलेम : इराण आणि अमेरिका यांच्यात सध्या युद्धविराम सुरू आहे आणि तो पुढे वाढवण्यासाठी चर्चा होणार आहे. दरम्यान,

russia vs ukraine : रशिया आणि युक्रेन दरम्यान ३२ तासांची शस्त्रसंधी

मॉस्को : ऑर्थोडॉक्स इस्टरनिमित्त रशियाने युक्रेनमध्ये ३२ तासांचा तात्पुरता युद्धविराम जाहीर केला. शनिवारी

Iran-US-Israel War : इराणला मोठा धक्का! माजी परराष्ट्र मंत्री कमाल खर्राजी यांचे निधन

- अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर प्राणज्योत मालवली इराण अमेरिका युद्धाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणचे

Iran-US-Israel War Ceasefire : अप्रत्यक्ष इराणला मदत करणारा पाकिस्तान शांतिदूत कसा ठरू शकतो ?

- पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर अमेरिकेचा प्रश्न पाकिस्तानने अमेरिका-इराण संघर्षात मध्यस्थी केली होती.

US Drone : अमेरिकेचा २०० दशलक्ष डॉलरचा ड्रोन इराणने पाडला ?

होर्मुझ सामुद्रधुनी : अमेरिकेचा २०० दशलक्ष डॉलरचा ड्रोन इराणने पाडला की तांत्रिक बिघाडामुळे हा ड्रोन समुद्रात